Asia Cup 2023: अय्यर पूर्णपणे फिट, राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, संजूला मिळाली संधी
KL Rahul Not Fully Fit Says Ajit Agarkar : आशिया चषकासाठी अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीन १७ जणांच्या चमूची निवड केली आहे.
KL Rahul Not Fully Fit Says Ajit Agarkar : आशिया चषकासाठी अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीन १७ जणांच्या चमूची निवड केली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीही दुखापतीनंतर संघात कमबॅक केलेय. पण केएल राहुल याच्या दुखापतीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहेत. राहुल अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आगरकर यांनी सांगितले. राहुलच्या दुखापतीबाबत आगरकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलेय. त्याशिवाय संजू सॅमसन याला बॅकअप विकेटकिपर म्हणून निवडल्याचेही सांगितलेय. आशिया चषकात राहुल आणि अय्यर यांना संधी दिली आहे. पाच महिन्यांच्या कालावधीनंतर दोघेही पुनरागमन करत आहेत.
टीम इंडियाच्या निवड समितीच अध्यक्ष अजित आगरकर यांनी आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली. त्याशिवाय केएल राहुलच्या फिटनेसबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही दिले. आगरकर म्हणाले की, केएल राहुल अजूनही दुखापतीचा सामना करत आहे. त्याला थोडासा त्रास होतोय, पण तो त्याच्या दुखापतीबद्दल नाही. अशा परिस्थितीत आम्ही बॅकअप खेळाडू म्हणून संजू सॅमसनचा संघात समावेश केला आहे.
आगरकर पुढे म्हणाला की, राहुलला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आशिया चषकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत वेळ लागेल. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही संजू सॅमसनचा बॅकअप खेळाडू म्हणून संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्याच्या फिटनेसची संपूर्ण माहिती लवकरच देऊ.
श्रेयस अय्यर फिट -
आशिया चषकाच्या संघात श्रेयस अय्यर याने कमबॅक केलेय. श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, अय्यरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. राहुल आणि अय्यर हे दोन्ही खेळाडू बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, राहुलशिवाय इशान किशनलाही यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. तर संजू सॅमसन याला बॅकअप म्हणून निवडलेय.
आशिया चषकासाठी भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)