BCCI Men’s Selection Committee : अध्यक्षांची निवड होताच BCCIचा गेमचेंजर मूव्ह! अजित आगरकर यांच्या निवड समितीत मोठी उलथापालथ, दोन दिग्गजांची एन्ट्री
BCCI Men’s Selection Committee Update : बीसीसीआयला अलीकडेच नवीन अध्यक्ष मिळाले असून ही जबाबदारी माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Pragyan Ojha-RP Singh join BCCI Selection Panel : बीसीसीआयला अलीकडेच नवीन अध्यक्ष मिळाले असून ही जबाबदारी माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याचबरोबर भारतीय संघाच्या निवड समितीतही मोठा बदल करण्यात आला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग (Pragyan Ojha, RP Singh join BCCI men's selection panel) आता पुरुष वरिष्ठ संघ निवड समितीचे सदस्य झाले आहेत. तर महिला क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून दिल्लीच्या अमिता शर्मा (Amita Sharma becomes new women's committee head) यांची नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारे निवड समितीचे चेअरमन अजित आगरकर यांना दोन नवे सहकारी मिळाले असून हे सर्व मिळून टीम इंडियाची निवड करतील.
बीसीसीआयने केलेले नवे बदल (Pragyan Ojha-RP Singh join BCCI Selection Panel)
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने पुरुष वरिष्ठ संघासाठी दोन नवीन निवडकर्त्यांची घोषणा केली होती. त्यानुसार प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग या दोन दिग्गजांना जबाबदारी देण्यात आली. महिला क्रिकेट निवड समितीत अमिता शर्मा या अध्यक्षा असतील. त्यांच्यासोबत सुलक्षणा नाईक, श्रवणती नायडू, श्यामा डे आणि जया शर्मा या सदस्य म्हणून काम पाहतील. तर एस. शरथ यांची ज्युनियर निवड समितीचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली आहे.
🚨 MEN's SELECTION COMMITTEE OF INDIAN SENIOR TEAM 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2025
1) Ajit Agarkar (Chairperson)
2) Shiv Sundar Das
3) Ajay Ratra
4) R. P. Singh
5) Pragyan Ojha pic.twitter.com/WBdahl0Ji3
बीसीसीआयची मोठी घोषणा
वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) निवड समित्या ठरवण्याबरोबरच बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता अंडर-16 खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, जोपर्यंत तो रणजी ट्रॉफीत आपल्या राज्यासाठी किमान एक सामना खेळत नाही. या नियमामुळे तरुण खेळाडूंना केवळ टी20च नाही, तर रणजीसारख्या कसोटीमानाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. यामुळे त्यांच्या कौशल्यात अधिक प्रगल्भता येईल.
मिथुन मन्हास झाले नवे अध्यक्ष (BCCI President Mithun Manhas)
याच बैठकीत बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षपदासाठी निवड झाली आणि मिथुन मन्हास यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली. ते पुढील तीन वर्ष या पदावर राहतील. याशिवाय देवजीत सैकिया हे सचिव, तर राजीव शुक्ला उपाध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.
आरपी सिंगची क्रिकेट कारकीर्द (RP Singh Cricket Career)
माजी वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंग याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याने टीम इंडियासाठी 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये कसोटी 40, एकदिवसीय 69 आणि टी-20 मध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो भाग होता. याव्यतिरिक्त, त्याने 94 प्रथम श्रेणी सामने, 136 लिस्ट ए सामने आणि 132 टी-20 सामने खेळले. 39 वर्षीय आरपी सिंगने 2011 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सध्या तो समालोचनात दिसतो आणि आता तो टीम इंडियाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रज्ञान ओझाची क्रिकेट कारकीर्द (Pragyan Ojha Cricket Career)
प्रज्ञान ओझाने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. त्याने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2013 मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. फिरकी गोलंदाज ओझाने भारतासाठी 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने कसोटी 113, एकदिवसीय 21 आणि टी-20 मध्ये 10 विकेट्स घेतल्या. ओझाने 108 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 424 विकेट्स घेतल्या. त्याने 103 लिस्ट ए सामन्यांमध्ये 123 आणि 143 टी-20 सामन्यांमध्ये 156 विकेट्स घेतल्या.





















