एक्स्प्लोर

मराठमोळ्या अंजिक्य राहणेचं मूळगाव चंदनापुरीतही ऑस्ट्रेलियाच्या गर्वहरणाचं सेलिब्रेशन

Ind vs Aus, India Gabba Test Win Historic : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांची 'घमेंड' उतरवली. या विजयाचं सेलिब्रेशन राहणेच्या मूळगाव चंदनापुरीत करण्यात आलं आहे.

संगमनेर : तब्बल तीन दशकानंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली. त्याचा आनंद ऑस्ट्रेलियापासून सातासमुद्रापार असलेल्या अजिंक्य रहाणेच्या मूळगावी संगमनेरमध्येही करण्यात आला. वयोवृद्ध आजीने आपल्या नातवाला मिळालेल्या यशानंतर कुटुंबियांना पेढे वाटप करत आनंद व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गा लगतच गाव. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच मुळगावचा. अजिंक्यचा जन्म संगमनेर तालुक्यातील आश्वी या मामाच्या गावी झाला आणि त्यानंतर वडिलांच्या नोकरी निमित्त आईवडिल व अजिंक्य मुबंई त स्थायीक झाले. मात्र, आजही अजिंक्यची आजी झेलूबाई, चुलते सीताराम व चुलती लक्ष्मीबाई हे चंदनापुरी गावातच वास्तव्य करतात. आज ऑस्ट्रेलियन भूमीवर तब्बल तीन दशकानंतर इतिहास रचत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली आणि त्याचा आनंद अजिंक्यच्या मूळगावी करण्यात आला. आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवीत आनंद साजरा केला तर ग्रामस्थांनी मूळगावी असलेल्या घराबाहेर फटाके फोडत विजयाचा जल्लोष केला.

India Gabba Test Win Historic | गाबामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, 1988 नंतर पहिला पराभव

ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली.

ऑस्ट्रेलियन संघासाठी ब्रिस्बेनचं गाबा मैदान एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियाला त्या मैदानात पराभूत करणं अशक्य असल्याचं म्हटलं जातं होतं. कारण 1988 पासून ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानात कधीही पराभूत झालेला नव्हता. शिवाय सुरुवातीला क्वॉरन्टीनमुळे जेव्हा भारतीय संघाने इथे खेळण्यास नकार दिला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियाची ब्रिस्बेनमधली कामगिरी शानदार आहे, त्यामुळेच भारतीय संघाला इथे खेळायचं नाही. परंतु रहाणेच्या नेतृत्त्वातील भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांची 'घमेंड' उतरवली.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने रचला इतिहास, अजिंक्य रहाणेच्या गावात फटाके फोडून जल्लोष!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Embed widget