(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aimal Khan : हा खेळाडू 16 वर्षाचा वाटतोय? वयाच्या घोटाळ्यामुळे पाकिस्तान पुन्हा चर्चेत
Aimal Khan : पाकिस्तानमध्ये सध्या एका खेळाडूची जोरदार चर्चा आहे. खेळामुळे नव्हे तर त्याच्या वयामुळे...
Aimal Khan : पाकिस्तानमध्ये सध्या एका खेळाडूची जोरदार चर्चा आहे. खेळामुळे नव्हे तर त्याच्या वयामुळे...पाकिस्तान सुपर लीगचा सध्या आठवा हंगाम सुरु आहे. यामध्ये 24 फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लेडियटर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडने बाजी मारली. पराभूत झालेल्या संघाकडून 16 वर्षीय आयमल खान याने टी 20 मध्ये पदार्पण केले. कागदोपत्री आयमल खान याचं वय 16 आहे, पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर वय लपवल्याचं स्पष्ट दिसतेय. याच कारणांमुळे आयमल खान आणि पाकिस्तान सुपर लीग सध्या चर्चेचा विषय आहे.
आयमल खान याच्या वयावरुन पाकिस्तानी पत्रकार साज सादिक याने ट्वीट केलेय. तो म्हणतो, आयमल खान याला पाकिस्तान बोर्डाने 16 वर्षाचा प्लेअर म्हणून रजिस्टर केले आहे. पण बोर्डाने खेळाडूचं खरं वय किती आहे? हे पाहायला हवं.
Aimal Khan - listed as 16 years old. PCB really needs to start looking at the actual age of some of these players #PSL8 #IUvQG pic.twitter.com/5tctSZU341
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) February 24, 2023
आपल्या पदार्पणाच्या सामन्यात आयमल खान याची पिटाई झाली. त्याच्या गोलंदाजीचा प्रतिस्पर्धी फलंदाजाने चांगलाच समाचार घेतला. पण त्याला कॉलिन मुनरो यासारखी मोठी विकेटही मिळाली. आपल्य पदार्पणाच्या सामन्यात आयमल खान याने चार षटकात 55 धावा खर्च केल्या. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, आयमल खान याचं वय 16 वर्ष 246 दिवस आहे. त्याचा जन्म 24 जून 2006 रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे झाला. काही लोकांच्या मते पठाण वयापेक्षा अधिच मोठे होतात, त्यामुळे त्यांचं वय जास्त दिसते. जर आयमल खान याने वय लपवले असेल तर पाकिस्तानमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. रमीज रजा यांनी वय लपवण्याचा प्रकार थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असताना ते याबाबत एक प्रोजेक्ट आणणार होते. त्यामुळे खेळाडूचं खरं वय समोर येईल.
He was scrutinized on the basis of appearance and bone testing reveals that he is of the said age, there is specefic area where people looks more than their age
— kashif mujib🇵🇰 (@kashifi43196826) February 24, 2023
आयमल खान या प्रकरणामुळे काही नेटकऱ्यांना इफ्तिखार अहमद याचं प्रकरणही आठवलं. 2022 टी-20 वर्ल्ड कपमध्ये इफ्तिखार आपल्या वयामध्ये ट्रोल झाला होता. लोक त्याला काका काका म्हणून डिवचत होते. टिव्हीवर त्याचं वय 32 सांगितलं जात होते, पण लोकांच्या मते त्याचं वय 42 इतके होते. दरम्यान शाहिद आफ्रिदीने प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तानात वय लपवले जाते हे मान्य केले होते.
आणखी वाचा :
कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....