India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघानं दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 नं विजय मिळवला. या दौऱ्यात संधी मिळालेल्या अनेक युवा खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केलं. भारताच्या विजयात युवा फलंदाज दीपक हुडानं चमकदार खेळी केली. तर, दुसऱ्या टी-20 मध्ये अखेरच्या षटकात आयर्लंडच्या फलंदाजांना रोखून उमरान मलिकनं सर्वांच मन जिंकलं. मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पांड्यानं युवा खेळाडूंच्या हातात ट्रॉफी सोपावून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पावलावर पाऊल ठेवलं.


हार्दिक पांड्याचं धोनीच्या पावलावर पाऊल
दरम्यान, आयर्लंड दौऱ्यावर पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यानं मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी उमरान मलिकच्या हातात सोपवली. त्यानंतर उमरान मलिकनंच विजयी सेलिब्रेशन केलं. ज्यामुळं सोशल मीडियावर हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. महेंद्रसिंह धोनी जेव्हा कोणतीही ट्रॉफी जिंकायचा, तेव्हा तो संघातील सर्वात युवा खेळाडूकडं ट्रॉफी सोपवून स्वत: बाजूला व्हायचा. 


ट्वीट-



आयर्लंड दौऱ्यात युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी
आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दीपक हुडाच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून आयर्लंडसमोर 226 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघानं भारताला कडवी झुंज दिली. या सामन्यातील अखेरच्या षटकात 17 धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या तीन चेंडूत 9 धावा दिल्यानंतर उमरान मलिकनं जबरदस्त कमबॅक करत शेवटच्या तीन चेंडूत फक्त तीन धावा दिल्या. ज्यामुळं भारतानं हा सामना चार धावांनी जिंकला. 


रोहितनंतर हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार होण्याची शक्यता
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. ज्यामुळे आयपीएल 2022 मध्ये गुजरातच्या संघाला ट्राफी जिंकून देणारा हार्दिक पांड्याकडं आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. 


हे देखील वाचा-