Kanhaiya Lal Murder Case: राजस्थानच्या (Rajasthan) उदयपूरमधील (Udaipur) कन्हैया लाल हत्या प्रकरणानं सर्वांनाच लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान, देशभरातील राजकीय नेते आणि सर्वसामान्यांसह क्रिडाविश्वातील दिग्गाजांनी या घटनेविरुद्ध निषेध नोंदवताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणनंही (Irfan Pathan) या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिलीय. एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवाला हानी पोहोचवणं म्हणजे मानवतेला दुखापत करणं होय, असं इरफान पठाणनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. 


इरफान पठाणनं कन्हैया लाल हत्याकांडप्रकरणी ट्विट करत ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलंय. "तुम्ही कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता हे महत्त्वाचं नाही. एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवाला हानी पोहोचवणं म्हणजे मानवतेला दुखापत करणं होय", अशी प्रतिक्रिया इरफान पठाणनं ट्वीटरच्या माध्यमातून दिलीय. इरफानच्या या ट्विटला चाहत्यांकडून पाठिंबा दर्शवला जातोय. 


इरफान पठाणचं ट्वीट-



नेमकं प्रकरण काय?
राजस्थानच्या उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. या हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय. आरोपींनी एका व्हिडीओच्या माध्यमातून हत्येची कबूली दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या आठ वर्षांच्या मुलानं नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यामुळं संतप्त झालेल्या काही लोकांनी कन्हैया लालच्या दुकानात घुसून त्याची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनी जोर धरलाय. 


हे देखील वाचा-