Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या लक्झरी लाईफसाठी ओळखला जातो. विराटची कमाई कोट्यवधीच्या घरामध्ये आहे. त्याची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. तसेच त्याला महागड्या वस्तूंची आवड असल्याचं दिसते. त्याच्याकडं एकापेक्षा एक अनोख्या आणि महागड्या वस्तू आहेत.
फ्लाइंग स्पर कारचा मालक
विराट कोहली बेंटले फ्लाइंग स्पर कारचा मालक आहे, अशी माहिती फायनान्शिअल एक्सप्रेसनं दिली आहे. या सेडानची किंमत जवळपास 3.97 कोटी आहे.
मुंबईत 34 कोटींचं घर
मुंबईच्या वरळी परिसरात विराट कोहलीनं अलिशान घर विकत घेतलंय. त्याची किंमत सुमारे 34 कोटी आहे. अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी 2016 मध्ये विराट कोहलीनं 7 हजार 171 चौरस फूट असलेलं हे घर विकत घेतलं होतं. विराटच्या घरातून संपूर्ण मुंबई शहर आणि अरबी समुद्र स्पष्टपणे दिसतो.
दिल्लीत 80 कोटींचा बंगला
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हरियाणातील गुरुग्राममध्ये आलिशान बंगला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या बंगल्याची किंमत 80 कोटी रुपये आहे. या बंगल्यात पूल, जिम आणि आलिशान गोष्टी आहेत.
आलिशान गाड्यांची आवड
विराटकडं महागड्या कारचे कलेक्शन आहे. विराट स्वतः रेंज रोव्हरचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर कार आहे ज्याची किंमत 80 लाख आहे. याशिवाय विराट आणि अनुष्काकडं Audi Q7, Audi S6, BMW X6, Audi A8 Quattro सारख्या कार आहेत ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. तसेच, विराटकडे ऑडी R8 V10 LMX देखील आहे ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.
85 हजारांचं पाकीट
विशेष म्हणजे, अलिशान घर आणि महागड्या कारचा मालक विराट कोहलीच्या पाकीटाचा मौल्यवान वस्तूंमध्ये समावेश आहे. त्याच्याकडे Loes Moytonji या ब्रँडचं पाकीट आहे, ज्याची किंमत 85 हजार रुपये आहे.
हे देखील वाचा-
- India Vs England: राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये फडकलाय भारताचा तिरंगा, आता प्रशिक्षक म्हणून इतिहास रचणार?
- Kanhaiya Lal Murder Case: कन्हैया लाल हत्याकांडप्रकरणी इरफान पठाणची संतप्त प्रतिक्रिया
- India tour of Ireland: हार्दिक पांड्याचं नेतृत्व, दिपक हुडाची दमदार कामगिरी, कसा होता भारताचा आयर्लंड दौरा?