On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) त्याच्या कारकिर्दीत असे काही विक्रम रचले आहेत, ज्यांना मोडणं कठीण मानलं जातं. यामुळं सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावे अजूनही जमा आहेत. आजच्या दिवशी 2007 मध्ये सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पा गाठला होता. अशी कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला होता. सचिन तेंडुलकराचा हा विक्रम आजही अबाधित आहे. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावापर्यंत पोहचता आलं नाही.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर?
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. त्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा तडाखेबाज फलंदाज सनथ जयसूर्या आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा-
क्रमांक | क्रिकेटपटूचं नाव | धावा |
1 | सचिन तेंडुलकर (भारत) | 18 हजार 426 |
2 | कुमार संगकारा (श्रीलंका) | 14 हजार 234 |
3 | रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) | 13 हजार 704 |
4 | सनथ जयसूर्या (श्रीलंका) | 13 हजार 430 |
हे देखील वाचा-
- India Vs England: राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये फडकलाय भारताचा तिरंगा, आता प्रशिक्षक म्हणून इतिहास रचणार?
- Kanhaiya Lal Murder Case: कन्हैया लाल हत्याकांडप्रकरणी इरफान पठाणची संतप्त प्रतिक्रिया
- India tour of Ireland: हार्दिक पांड्याचं नेतृत्व, दिपक हुडाची दमदार कामगिरी, कसा होता भारताचा आयर्लंड दौरा?