India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्याने (India vs South Africa T20 Series) मालिकेत भारत 1-0 ने पिछाडीवर आला आहे. गुरुवारी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानातील या सामन्यात भारताचा 7 विकेट्सनी पराभव झाला. भारतीय गोलंदाजांच्या खराब गोलंदाजीमुळे हा पराभव झाला असला तरी युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने (Aavesh khan) टाकलेल्या वेगवान चेंडूने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची बॅटच तोडली. 


तर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना आवेश 14 वी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला. ओव्हरचा पहिला चेंडू वाइड गेला. त्यानंतर तीनही चेंडूवर एकही धाव फलंदाजांना घेता आली नाही. याचदरम्यान तिसरा चेंडू यॉर्कर टाकला असता तो ड्राईव्ह मारण्याच प्रयत्न आफ्रिकेच्या रासी डस्सेनने (Rassie van der Dussen) केली. त्याच वेळी चेंडू अत्यंत वेगात असल्याने रासीची बॅटच तुटल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी तो 26 चेंडूवर 22 धावांवर खेळत होता. ज्यानंतर त्याने बॅट बदलली आणि त्याचा खेळही बदलला. सामन्यात त्याने 46 चेंडूत 75 धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला.



भारताचा सात विकेट्सनी पराभव


डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. डेविड मिलरने नाबाद 64 तर डुसेन याने नाबाद 75 धावांची खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. 


हे देखील वाचा-