Mohammad Shami On Mohsin Khan: लखनौ सुपर जायंट्स वेगवान गोलंदाज मोहसीन खाननं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत क्रिडाविश्वावर छाप सोडलीय. मोहसीननं त्याच्या वेगानं आणि नियंत्रणानं सर्वांना प्रभावित केलंय. यादरम्यान, मोहसिन खानचा प्रशिक्षक बदरूद्दीन सिद्दीकी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. "भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं आयपीएलच्या मेगा ऑक्शनदरम्यान सांगितलं होतं की, मोहसीन खानला चार महिन्यातचं भारताचा बेस्ट ऑलराऊंडर बनवेल. त्यावेळी शामीनं मोहसीन खानच्या फलंदाजीचंही कौतूक केलं होतं", असंही सिद्दीकी यांनी म्हटलंय.
बदरूद्दीन सिद्दीकी काय म्हणाले?
मोहसीन खानच्या प्रशिक्षकानं तो क्षण आठवला, जेव्हा आयपीएलचं ऑक्शन सुरु होतं."मी मोहम्मद शमीसोबत त्याच्या फार्म हाऊसवर होतो. त्यावेळी मोहम्मद शमीनं मला म्हटलं होतं की, जर मला मोहसीनसोबत चार महिने घालवण्याची संधी मिळाली, तर मी त्याला भारताचा बेस्ट ऑलराऊंडर बनवेल. मोहम्मद शामी म्हणाला होता की, मोहसीन खान खूप चांगला फलंदाज आहे." लखनऊ सुपर जॉइंट्सचा कर्णधार केएल राहुलनंही मोहसीनच्या फलंदाजीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. लखनौ सुपर जॉइंट्सनं अवघ्या 20 लाख रुपयांत मोहसीन खानला संघात सामील करून घेतलं होतं.
मोहसीन खानची दमदार कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मोहसीन खाननं चांगलं प्रदर्शन करून दाखवलं. या हंगामात त्यानं नऊ सामन्यात 14.07 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या. त्यावेळी त्याचा इकोनॉमी 5.97 इतका होती. मोहसीन खानची फलंदाजी पाहून अनेक दिग्गज खेळाडू प्रभावित झाले होते. मोहसीन खानला सुरुवातीपासून लखनौच्या संघात स्थान मिळालं असतं तर त्यानं कदाचित या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या टॉप 5 मध्ये जागा मिळवली असती. याशिवाय, तीन सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ज्यात त्यानं 23 धावा केल्या. यापैकी दोन सामन्यात तो नाबाद होता.
हे देखील वाचा-