Reasons behind India Defeat against South Africa: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात भारतानं निश्चितच वर्चस्व गाजवलं, पण काही चुकांमुळं भारताच्या पदरात निराशा पडली. भारतीय संघाकडून नेमकं कुठं चूक झाली? हे जाणून घेऊयात.


रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडणं महागात पडलं
रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडणं भारतीय संघाच्या पराभवातील एक महत्वाचं कारण आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 29 चेंडूत 63 धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 16 व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरनं रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडला. त्यावेळी रासी 30 चेंडूत 29 धावांवर खेळत होता. मात्र, जीवनदान मिळाल्यानंतर त्यानं आक्रमक फलंदाजी करत पुढच्या 16 चेंडूत 45 धावा ठोकत भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला.


पंतच्या नेतृत्वात कमतरता
या सामन्यात ऋषभ पंतच्या कर्णधारपदात काही कमतरता जाणवल्या. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलकडून त्याला संपूर्ण षटक काढता आलं नाही. चहलनं फक्त 2.1 षटकं टाकली. युजवेंद्र चहल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याच्याकडून संपूर्ण षटक करून घेतले असते तर, कदाचित भारताला विकेट्स मिळाली असती. पण, ऋषभ पंतनं तसं केलं नाही. 


भारताची खराब गोलंदाजी
कोणत्याही सामन्यात 200 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठणं प्रत्येक संघासाठी आव्हानत्मक असतं. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 212 धावांचं लक्ष्य 19.1 षटकातचं गाठलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करून दाखवली. फक्त आवेश खानला सोडलं तर, इतर गोलंदाजांची इकोनॉमी 10 पेक्षा अधिक होती. हार्दिक पांड्यानं त्याच्या एका षटकात 18 धावा खर्च केल्या. तर भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांसारख्या गोलंदाजांनी प्रत्येकी 40 हून अधिक धावा दिल्या. 


हे देखील वाचा-