India vs South Africa, 1st T20I Delhi: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. हे त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पुन्हा सिद्ध करून दाखवलं. दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात त्यानं तुफानी फलंदाजी केली. त्यानं 48 चेंडूत 76 धावा ठोकल्या. या कामगिरीसह त्यानं भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. तसेच भारताचा कर्णधार रोहित शर्मा, माजी क्रिकेटपटू सुरैश रैना यांच्या खास पंक्तीत स्थान मिळवलंय.
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचा विशाल धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून सलामीवीर ईशान किशननं महत्वाची भूमिका बजावली. त्यानं 48 चेंडूत 76 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची ही चौथी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. याबाबतीत त्यानं विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 72 आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
क्रमांक | फलंदाज | धावा |
1 | रोहित शर्मा | 106 |
2 | सुरेश रैना | 101 |
3 | मनीष पांडे | 79* |
4 | ईशान किशन | 76 |
5 | विराट कोहली | 72* |
रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा
टी-20 आंतरराष्ट्रीत क्रिकेटमध्ये भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एका डावात सर्वाधिक 106 धावा केल्या आहेत. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचा क्रमांक लागतो. त्यानं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एका डावात 101 धावांची खेळी केवली होती. त्यानंतर 79 धावांसह मनीष पांडे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-