IND vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सात विकेट्सनं पराभव झाला. दिल्लीत खेळण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.


सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
भारतीय संघाचे फलंदाज धावांचा पाऊस पाडत असताना सोशल मीडियावर टीम इंडियाचं कौतुक होत होतं. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वादळी खेळी सुरू करताच नेटकऱ्यांनी भारतीय खेळाडूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.ऋषभ पंत सर्वाधिक ट्रोल होऊ लागला. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला. काही भारतीय गोलंदाजांवर मीम्स शेअर करत होते. तर, काही डेव्हिड मिलर आणि रासी व्हॅन डर डसेनचं कौतुक करत होते. 


ट्वीट-



ट्वीट-



ट्वीट- 



ट्वीट-


 


ट्वीट-



ट्वीट- 



ट्वीट-



 


भारताचा सात विकेट्सनं पराभव
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात फलंदाजी करताना भारतीय संघानं विकेट्स गमावून 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अवघे तीन विकेट्स गमावून हे मोठं लक्ष्य गाठलंय.


हे देखील वाचा-