एक्स्प्लोर

37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाला कांस्यपदक, उपांत्य सामन्यात हरयाणाकडून पराभूत

37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

पणजी : महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कॅम्पाबेल मल्टपर्पज क्रीडा संकुल येथे झालेल्या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत हरयाणाने १२व्या मिनिटाला महाराष्ट्रावर पहिला लोण देत १८-११ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला २०-१६ अशी नाममात्र आघाडी हरयाणाकडे होती. उत्तरार्धात आणखी एक लोण देत ती ३३-२२ अशी वाढवली. महाराष्ट्राला हरयाणावर लोण देण्याची नामकी संधी आली होती. मैदानावर शिलकी तीन खेळाडू होते आणि अजय नरवालची तिसरी चढाई होती. या चढाईत त्याने अरकमला टिपले व त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूची पकड झाली. त्यामुळे तो होणारा लोण हरयाणाने वाचवला. महाराष्ट्राच्या शंकर गदई व किरण मगर यांनी एक-एक  अशा दोन अव्वल पकडी केल्या. पण त्याचे रुपांतर विजयात करता आले नाही. 

महाराष्ट्राकडून अस्लम शेख, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, किरण मगर, शंकर गदई यांनी संघाचा पराभव टाळण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेनादलाने चंदीगड ४९-२५ असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली. सेनादलविरुद्ध हरयाणा अशी पुरुषांत, तर हिमाचल प्रदेश विरुद्ध हरयाणा अशी महिलांत अंतिम लढत होईल. महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये यंदा एकच कांस्यपदक मिळवता आले. महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान सोमवारी साखळीतच संपुष्टात आले. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन्ही गटांत रौप्यपदके पटकावली होती.

सुरुवातीच्या पाच मिनिटांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेऊन प्रतिस्पर्धी हरयाणावर चांगले दडपण निर्माण केले होते. पण ते टिकवण्यात अपयशी ठरलो. पाच मिनिटे बाकी असताना हरयाणाचे तीनच खेळाडू मैदानावर होते. त्यावेळ लोण देत सामन्यावर पकड निर्माण करण्याची संधी आपण दवडली. अन्यथा, महाराष्ट्र अंतिम फेरीत पोहोचला  असता आणि सुवर्णपदकावर दावेदारी केली असती. महाराष्ट्राच्या संघातील सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळ केला.
-दादासो आव्हाड, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक

नेमबाजी - महाराष्ट्राच्या सोनम मस्करला अंतिम फेरीत सहावा क्रमांक

महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत अजूनही महाराष्ट्राला पदक पटकावता आलेले नाही. सोनमला अंतिम फेरीत एकूण १६५.९ गुण मिळाले. सोनमने पात्रता फेरीत ६२८.१ गुण मिळवले. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धेक अनन्या नायडू (६२७.१ गुण) अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली. या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मेहुली घोषला सुवर्ण, हरयाणाच्या नॅन्सीला रौप्य आणि बंगालच्या स्वाती चौधरीला कांस्यपदक मिळाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
Rohit Sharma : 19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Indian Migrants In America : मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Feb 2025 : ABP Majha : 11PMABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025Special Report on Santosh Deshmukh : अुनत्तरीत प्रश्नांचे 2 महिने; फरार आरोपी आंधळे आहे तरी कुठे?Special Report On Rajan Salvi : उद्धव ठाकरेंचे निष्ठावान, हाती घेणार धनुष्यबाण? मात्र सामंत ब्रदर्सचा विरोध?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
Rohit Sharma : 19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Indian Migrants In America : मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
Success Story : खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
Rohit Sharma Century : BCCI साठी गुडन्यूज! हिटमॅन इज बॅक, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी षटकार मारून रोहित शर्माने ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video
BCCI साठी गुडन्यूज! हिटमॅन इज बॅक, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी षटकार मारून रोहित शर्माने ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; तब्बल 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
Embed widget