टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड, इरफान पठाणने निवडले 15 शिलेदार!
T20 World Cup Squad : विश्वचषकात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघात कोण कोण असेल? कोणत्या गोलंदाजांना स्थान मिळणार? अष्टपैलू कोण असतील? विकेटकीपर कोण असेल? याबाबतच्या चर्चा सुरु आहेत.
Irfan Pathan India T20 World Cup Squad : भारतात सध्या आयपीएलचा (IPL 2024) रनसंग्राम सुरु आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये आपलं नशीब अजमावत आहेत. ही स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकत आहेत. आयपीएलसोबतच टी 20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) चर्चेलाही जोर आलाय. 2 जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम होणार आहे. विश्वचषकात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघात कोण कोण असेल? कोणत्या गोलंदाजांना स्थान मिळणार? अष्टपैलू कोण असतील? विकेटकीपर कोण असेल? याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. माजी वेगवान गोलंदाज इरफान पाठण (Irfan Pathan) यानं टी 20 विस्वचषकासाठी 15 जणांच्या चमूची निवड केली आहे.
टी 20 विश्वचषकासाठी इरफान पठाण यानं टीम इंडियात अनेक स्टार आणि दिग्गजांचा समावेश केलाय. इरफान पठाणने निवडलेला संघ संतुलित दिसत आहे. इरफान पठाणच्या संघात हार्दिक पांड्याला स्थान मिळालेय, पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असेल, तरच त्याला संघात स्थान द्यावं, असे म्हटलेय. हार्दिक पांड्याला फक्त फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं जाऊ नये, असं इरफान पठाणला वाटतेय.
इरफान पठाणने आपल्या ताफ्यात विराट कोहलीला स्थान दिलेय. त्याशिवाय आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या शिवम दुबे यालाही सामील केलेय. वेगवान गोंलादाजीची धुरा जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच्या जोडीला अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज यांना स्थान दिलेय. इरफान पाठण यानं चहल आणि बिश्नोईपैकी एकाला स्थान द्यावं, असे म्हटलेय, त्याशिवाय गिल आणि संजूपैकी एकाला निवडावे असेही म्हटलेय. दरम्यान, इरफान पठाण यांन राखीव खेळाडू किती हवेत याबाबतही सांगितलेय. दोन वेगवान गोलंदाज, एक विकेटकीपर आणि एका फलंदाजाला राखीव ठेवावं, असं इरफानने म्हटलेय.
2024 विश्वचषकासाठी इरफान पठाण यानं निवडलेल्या ताफ्यात कोण कोण ?
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (गोलंदाजी करत असेलच तरच), रिंकू सिंह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, शुभमन गिल/संजू सऍमसन, रवि बिश्नोई/युजवेंद्र चहल.
My squad for the World Cup.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 24, 2024
1) Rohit Sharma (C)
2) Yashasvi Jaiswal
3) Virat Kohli
4) Surya Kumar Yadav
5) Rishabh pant (wk)
6)Shivam Dube
7) Hardik Pandya provided he is bowling regularly
8)Rinku singh
9)Ravindra jadeja
10) Kuldeep Yadav
11)Jasprit Bumrah
12)Arshdeep…
दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली जाणार आहे.
हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता, वीरेंद्र सहवागनं निवडला टी20 विश्वचषकासाठी संघ