एक्स्प्लोर

रोहित शर्मा-यशस्वीची दीडशतकी सलामी, भारतीय संघाकडे आघाडी, सामन्यावरही वर्चस्व

Ind vs WI 1st Test :अश्विन आणि जाडेजा यांच्या भेदक फिरकीनंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीवर वर्चस्व मिळाले आहे.

Ind vs WI 1st Test :अश्विन आणि जाडेजा यांच्या भेदक फिरकीनंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीवर वर्चस्व मिळाले आहे. वेस्ट इंडिजला 150 धावांत रोखल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी विकेट न फेकता वेस्ट इंडिजची आघाडी मोडून काढली. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली आहे. 330 पेक्षा जास्त चेंडूचा सामना करत या दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. पहिल्या दिवशी या या जोडीने बिनबाद 80 धावांची खेळी केली होती. आज त्यामध्ये आणखी भर टाकत भारताला आघाडी मिळवून दिली आहे. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांनी 150 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली आहे. वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव 150 धावांत संपुष्टात आला होता. भारतीय संघाने एकही विकेट न फेकता ही धावसंख्या पार केली आहे. 

पदार्पण करणाऱ्या यशस्वी जायस्वाल याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. यशस्वी जायस्वाल याने रोहित शर्माला चांगली साथ दिली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी तुफानी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने पदार्पणातच अर्धशतक झळकावत आपली प्रतिभा दाखवून दिली. यशस्वी जायस्वाल 67 तर रोहित शर्मा 68 धावांवर खेळत आहे. यशस्वी जायस्वाल याने सात चौकार लगावले. तर रोहित शर्माने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाकडे सध्या आघाडी झाली आहे.  

यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल झाले. एकाही गोलंदाजाचा मारा प्रभावी वाटला नाही. वेस्ट इंडिजने सात गोलंदाजाचा वापर केला, पण एकालाही विकेट घेता आली नाही. रोहित शर्माने कसोटीत मोठा विक्रम नावावर केला आहे. कसोटीमध्ये सलामीला रोहित शर्माने 39 डिवात सहा शतके आणि पाच अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केलाय. त्याशिवाय कसोटीमध्ये रोहित शर्माने 3500 धावांचा पल्ला पार केला आहे. रोहित शर्माने 46 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. 2019 मध्ये रोहित शर्मा कसोटीत सलामीला उतरला अन् तेव्हापासून त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. सलामीला फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा काढण्यात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs GT IPL Final 2026: आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती
आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल; गुजरात आणि बंगळुरु भिडणार, जेतेपद जिंकल्यास कुणाला किती रुपये मिळणार?, A टू Z माहिती
T20 Mumbai League : ‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
‘आमच्या टीममध्येही वैभव सूर्यवंशी!’; जेतेपद राखण्यासाठी ‘मराठा रॉयल्स’ सज्ज, कॅप्टन सिद्धेश लाड काय म्हणाला?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत
मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget