Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पाचवं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. हे पदक भारताने टेबल टेनिस खेळाच्या पुरुष टीमच्या स्पर्धेत निश्चित केलं आहे. भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरला (India vs Singapore)  मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने 3-1 च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला.






सामन्यात सर्वात आधी भारताची अप्रतिम जोडी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी सिंगापूरच्या योंग क्यूक आणि यू एन पांग यांना 13-11, 11-7 आणि 11-5 अशा तीन सेट्समध्ये मात देत भारताला सामन्यात 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या क्लियरन्स च्यूयू याने शरथ कमलला 11-7, 12-14, 11-3 आणि 11-9 अशा फरकाने मात दिल्यामुळे सामन्यात दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आले.


अखेरच्या सामन्यात भारत विजयी


त्यानंतर तिसऱ्या सामन्यात जी. साथियान याने अप्रतिम खेळ करत कोन पांग याला 12-10, 7-11, 11-7 आणि 11-4 च्या फरकाने नमवत भारताला 2-1 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या सामन्यात हरमीत देसाईने क्लियरन्स च्यूयू याला 11-8, 11-5 आणि 11-6 च्या फरकाने मात देत सामना भारताला 3-1 ने जिंकून दिला. या विजयामुळे भारताच्या नावे सलग दुसऱ्यांदा कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक झालं आहे.


हे देखील वाचा-