Harjinder Kaur Motivational Story: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत (CWG 2022 Weightlifting Competition) भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरनं (Harjinder Kaur) भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. ज्यामुळं देशभरातून तिचं अभिनंदन केलं जातंय. महत्वाचं म्हणजे, हरजिंदर कौरनं यिथंपर्यंत पोहचण्यासाठी कठोर परिश्रम केले. भारताचं प्रतिनिधित्व करण्यापूर्वी हरजिंदर कौर गवत कापण्याचं काम करायची. परंतु, तिनं आपली जिद्द सोडली नाही आणि अखेर इंग्लंडमध्ये भारताचा तिरंगा फडकावला.
पॉकेटमनी म्हणून 350 रुपये मिळायचे
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात हरजिंदर कौरनं 71 किलो गटात कांस्यपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत तिनं एकूण 212 किलो वजन उचललं. तिनं इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अॅलेक्सिस अॅशवर्थ यांना मागं टाकत कांस्यपदकावर कब्जा केलाय. हरजिंदर कौरचा प्रवास काही सोपा नव्हता. याशिवाय घरची परस्थिती हालाकीची होती. त्यांच्याकडं सहा म्हशी होत्या. पण ते दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे. पंजाबच्या मध्यवर्ती भागात कबड्डी हा लोकप्रिय खेळ आहे. सुरुवातीला तिला कबड्डी खेळायला आवडायची होती. प्रथम कबड्डी नंतर रस्सीखेच आणि त्यानंतर वेटलिफ्टिंगमुळं तिनं तिच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यास मदत केली. हरजिंदर कौरला 350 रुपये पॉकीटमनी मिळायचे.
प्रशिक्षक परमजीत शर्मानं हरजिंदर कौरची प्रतिभा ओळखली
हरजिंदर कौर ही साहिब सिंह आणि कुलदीप कौर यांची सर्वात लहान मुलगी आहे. ज्यावेळी हरजिंदरनं कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तिच्या प्रशिक्षकानं तिला कबड्डी खेळण्यासाठी प्रभावित केलं. एक वर्षानंतर हरजिंदर कौरचा पंजाब युनिव्हर्सिटी, पटियालामध्ये स्पोर्ट्स विंगमध्ये समावेश करण्यात आला. जिथे परमजीत शर्मानं तिची प्रतिभा ओळखली. किशोर वयातील तिची ताकद पाहून मला आश्चर्य वाटलं, ती वारंवार आपल्या गावाला परतायची आणि वेटलिफ्टिंगमध्ये फारसा रस दाखवत नव्हती. परंतु, वेळेनुसार तिच्यात सुधारणा होत गेली.
हे देखील वाचा-