Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 1930 पासून सुरू झालेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारत आठराव्यांदा सहभागी होईल. यावर्षी 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंसह भारत एकूण 15 खेळांमध्ये दम दाखवणार आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी सहभाग घेतलाय. दरम्यान, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रासह (Neeraj Chopra), पीव्ही सिंधु (PV Sindhu), मीराबाई चानू (Mirabai Chanu), रवि दहिया (Ravi Dahiya), निकहत जरी (Nikhat Zareen) आणि मनिका बन्ना (Manika banna) यांच्याकडून सुवर्णपदाकाची अपेक्षा केली जात आहे. 


पीव्ही सिंधू
भारताचा स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू ही कॉमनवेल्थ स्पर्धेत तिसऱ्यांदा भारताचा प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, आतापर्यंत खेळण्यात आलेल्या एकेरी महिलेच्या स्पर्धेत तिनं एक-एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदक जिंकलंय. तर, 2018 मध्ये मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये सिंधूनं सुवर्णपदक जिंकला होता. महत्वाचं म्हणजे, चीन आणि जपानचे खेळाडू कॉमनवेल्थ स्पर्धेत भाग घेत नाहीत. ज्यामुळं दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूसाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा मार्ग सोपा मानला जातोय. 


मीराबाई चानू
टोकियो ऑलम्पिक 2018 मध्ये मीराबाई चानूनं भारतासाठी सुवर्णपदक जिंकून संपूर्ण देशाचं मनं जिंकली. एवढेच नव्हे तर, 2014 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेतही मीराबाई चानूनं रौप्यपदक जिंकलं होतं. यातच बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत मीराबाई चानूकडून सुवर्णपदाकाची अपेक्षा केली जात आहे. 


रवि कुमार दहिया
भारताचा रेसलर रवि कुमार दहियानं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत 57 किलो गटात भारतीय संघांचं प्रतिनिधित्व करतात. त्यानं टोकियो ऑलम्पिंक स्पर्धेत देशासाठी रौप्यपदक जिंकलं होतं. आता तो बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी रिंगणात उतरणार आहे. 


निकहत जरीन
भारताची महिला बॉक्सर जरीनं जून 2022 मध्ये पार पडलेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी निकहत जरीन पाचवी महिला बॉक्सर आहे. यामुळं कॉमनवेल्थ स्पर्धेत निकहत जरीनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे. 


मानिका बन्ना
भारताची महिला टेबल टेनिसपटू मानिका बन्नानं 2018 मध्ये गोल्डकॉस्ट कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकासह चार पदक जिंकले आहेत. यामुळं कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत सर्वांची नजर तिच्यावर असेल.  27 वर्षीय मनिका बत्रा सध्या भारतातील अव्वल महिला टेबल टेनिसपटू आहे आणि ती सध्या एकेरीत 41व्या क्रमांकावर आहे. आशा आहे की यावेळीही मनिका इतिहास रचेल.


हे देखील वाचा-