Rohit Sharma on Axar Patel : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दोन गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला अक्षर पटेल. मोक्याच्या क्षणी तुफानी अर्धशतक अक्षरने ठोकलं. दरम्यान या विजयानंतर अक्षरसह सर्व भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव झाला असून भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही खास ट्वीट करत संघाला शुभेच्छा दिला. यावेळी त्याने अक्षरला उद्देशून खास गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत.
'बापू बढू सारू छे...'
रोहित शर्माने त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलरव टीम इंडियाला शुभेच्छा देत याला म्हणतात खेळ असं म्हणत 'बापू बढू सारू छे...' हे गुजराती वाक्य लिहित अक्षरला टॅग केलं आहे. याचा मराठीत अर्थ घेता एकदम झकास कामगिरी असा होऊ शकतो. दरम्यान रोहितचं हे ट्वीटही व्हायरल झालं असून भारतीय क्रिकेट चाहते यावर कमेंट्स करत आहेत.
35 चेंडूत 64 धावांची वादळी खेळी
वेस्ट इंडीजविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अक्षर पटेलनं फक्त 35 चेंडूत 64 धावांची वादळी खेळी केली. ज्यात पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. त्यानं 182 स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांनी 33 चेंडूत 51 धावांची भागेदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.
अक्षर ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार
या सामन्यात भारताला अखेरच्या 10 षटकात 100 धावांची आवश्यकता होती. परंतु, भारताकडून क्रीजवर उभा असलेला अक्षर पटेल वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करत होता. या सामन्यातील अखेरच्या षटकात भारताला 8 धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या दोन चेंडूत दोन धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूत अक्षर पटेलनं षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-
- IND vs WI : 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर सिराजच्या वक्तव्यानं जिंकली मनं
- IND vs WI, 2nd ODI Highlights : रोमहर्षक सामन्यात भारत दोन विकेट्सनी विजयी, अक्षरचं शानदार अर्धशतक, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- Shai Hope : शाय होपने शानदार शतक झळकावत केली अनोखी कामगिरी, 'या' यादीत झाला सामिल