Marathwada: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर बसला असल्याचे, प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. मराठवाड्यातील 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला आहे. दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून, अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहे. तर मराठवाड्यातील 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 

जिल्हा  बाधित शेतकरी   जमिनीचे नुकसान  बाधित गावे 
औरंगाबाद  00 00 00
जालना  377 255.74 हेक्टर  01
परभणी  1500 1 हजार 200हेक्टर 03
हिंगोली  85600 76 हजार 771 हेक्टर 62
नांदेड 533384 2 लाख 98 हजार 861.17 हेक्टर 1570
बीड 58 26.80 हेक्टर 01
लातूर  775 1 हजार 640.57 हेक्टर 08
उस्मानाबाद 00 00 02

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी...

जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी पाहता विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करण्यात यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची मागणीही अजित पवार यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Ajit Pawar : अजित पवारांचे हवामान विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, होसाळीकर म्हणाले हवामान विभागाकडं पुढच्या 25 वर्षाचे नियोजन

Jayakwadi: जायकवाडीतील पाण्याचा विसर्ग वाढवला; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा