On this Day: पुरुष क्रिकेटप्रमाणे आता महिला क्रिकेटलाही (Women's Cricket) दिवसेंदिवस मोठी पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय महिला संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही काळात भारतीय महिला संघानं दमदार कामगिरी करत जगावर छाप सोडलीय. परंतु, महिला क्रिकेटचा पहिला सामना कधी खेळला गेला? भारतात महिला क्रिकेटची सुरुवात कशी झाली? याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात. 


पहिला क्रिकेट सामना कधी खेळला?
क्रिकेटच्या इतिहासात 26 जुलै 1945 रोजी महिलांमध्ये पहिला क्रिकेट सामना खेळला गेला.पण 1887 मध्ये प्रथमच यॉर्कशायरमध्ये महिला क्रिकेट क्लबचं नाव समोर आले. तीन वर्षांनंतर इंग्लंडमध्ये पहिला संघ तयार झाला ज्याला इंग्लंड लेडी क्रिकेटर असं नाव देण्यात आलं. ऑस्ट्रेलियात 1984 मध्ये पहिली महिला क्रिकेट लीग खेळण्यात आली. 


आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेची स्थापना
1958 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेची स्थापना झाली. जगभरात महिला क्रिकेटचा प्रचार आणि आवड निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटची स्थापना केली होती. एवढेच नव्हे तर, महिला क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेचे 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये विलीनीकरण करण्यात आले.


इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला पहिला महिला कसोटी सामना
इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात डिसेंबर 1934 मध्ये पहिला महिला कसोटी सामना खेळला गेला. 1973 पासून आजपर्यंत महिलांसाठी एकदिवसीय क्रिकेट सामने आयोजित केले जातायेत. 


भारतात महिला क्रिकेटची सुरुवात कशी झाली?
भारतात 16 व्या शतकात क्रिकेटची सुरुवात झाली. 1721 मध्ये पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला. त्यानंतर 1848 मध्ये मुंबईत पॅरिस समुदायानं पहिला क्रिकेट क्लबची स्पापना केली. भारतीय संघानं पहिला कसोटी सामना 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेला. भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1973 मध्ये भारतात महिला क्रिकेटची सुरुवात झाली. भारतीय महिला संघानं 1976 मध्ये पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. 2006 मध्ये, भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळात विलीनीकरण करण्यात आलं. 


हे देखील वाचा-


Chahal's Iconic Pose Viral : भारताचा दमदार विजय, मालिकाही खिशात, विजयानंतर अक्षर-आवेशचं खास 'चहल स्टाईल' सेलिब्रेशन


Shreyas Iyer : श्रेयस अय्यरनं अफलातून झेल पकडत केलं खास सेलिब्रेशन, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?


IND vs WI : 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर सिराजच्या वक्तव्यानं जिंकली मनं