Commonwealth Games 2022: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील (Commonwealth Games 2022) जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हीने सुवर्ण पदक (Mirabai Wins Gold medal) भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
यावेळी मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 88 किलोग्राम वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे त्याने एकूण (113+88) 201 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा रेकॉर्ड करत मीराबाईने गोल्ड जिंकवून दिलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती, जी तिने पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय वेटलिफ्टर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. आजच्या दिवसात भारताने मिळवलेलं हे तिसरं पदक आहे. आधी संकेत सरगर (Sanket Sargar) मग गुरुराज पुजारी (Gururaj Pujari) यांनी अनुक्रमे रौप्य आणि मग कांस्य पदक मिळवलं.
वेटलिफ्टिंगमधील तिसरं पदक
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने आज दिवसभरात तीन पदकं मिळवली आहे. सर्वात आधी 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवलं. त्यानंतर आता 61 किलो वजनी गटात एकूण 269 किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवलं आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांना गवसणी घातली आहे.
हे देखील वाचा -
- CWG, Sanket Sargar Wins Medal : भारताची पहिल्या पदकाला गवसणी, संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं रौप्यपदक
- CWG 2022: भारताच्या दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण शेड्युल; कुठे, कधी आणि कोणाशी होणार सामने, कॉमनवेल्थमधील प्रत्येक खेळांची अपडेट