Mumbai : ठाणे जिल्ह्यात 50 पेक्षा अधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून चार जणांचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्णा आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


सध्या राज्याच्या विविध भागात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. शिवाय या स्वाईन फ्लू मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बदलापूर शहरात एका डॉक्टरलाच स्वाईन फ्लूची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे. या डॉक्टरला स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने त्याला बदलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र, या डॉक्टरलाच स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न होताच या खाजगी रुग्णालयाने बदलापूर पालिकेला याची माहिती दिली. पालिकेने तात्काळ रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी जाऊन सर्व्हे केला असून तपासणी सुरू केली आहे. या भागात आणखी स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत की नाही हे पाहण्यासाठी पालिकेकडून तपासणी केली जाते. दरम्यान, या डॉक्टरच्या घरी परदेशातून काही लोक आल्याने त्यांच्यापासून या डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, बदलापुरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्णालय आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


स्वाईन फ्लूची लक्षणे :



  • ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या जुलाब ही सर्वसाधारण स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. 

  • गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो.

  • रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


अशी घ्या काळजी :



  • खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे.

  • हात वारंवार स्वच्छ करावे.

  • डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.


महत्वाच्या बातम्या :