CWG 2022 Day 2 India Full Schedule: बर्मिंगहॅम येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करून देशासाठी पदक जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर, काही भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पडलीय.  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आज दुसरा दिवस आहे. पहिल्या सामन्यात घानाचा 5-0 नं पराभव केल्यानंतर भारतीय हॉकी संघ आज वेल्सशी या स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहे. महिलांच्या 49 किलो वजनी गटात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूकडून  सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे. तर, भारतीय बॉक्सर लोव्हलिनावरही सर्वांचं लक्ष असेल. याशिवाय आज होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक कसं असेल? हे पाहुयात.

जलतरण स्पर्धा पुरुषांची 200 मीटर फ्रीस्टाइल, हीट 3: कुशाग्र रावत - दुपारी 3.06 वाजतापुरुषांची 100 मीटर बॅकस्ट्रोक फायनल - श्रीहरी नटराजन - दुपारी 1:35 वाजता

हॉकीमहिला पूल अ: भारत वि वेल्स (रात्री 11.30)

बॅडमिंटनमिश्र सांघिक गट टप्पा-अ गट: भारत विरुद्ध श्रीलंका - दुपारी 1.30 वाजता.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - रात्री 11.30 वाजता.

बॉक्सिंग54 किलो - 57 किलो (फेदरवेट) फेरी 32: हुसामुद्दीन मोहम्मद - संध्याकाळी 5 वाजता66 किलो - 70 किलो (हलके मध्यम वजन) फेरी 16: लोव्हलिना बोर्गोहेन - 12 वाजता

टेबल टेनिसमहिला गट 2: भारत विरुद्ध गयाना - दुपारी 2पुरुष गट 3: भारत विरुद्ध उत्तर आयर्लंड - 4.30 pm

सायकलिंगमहिला स्प्रिंट पात्रता: मयुरी लट्टे, त्रियशा पॉल (दुपारी 02.30 ते संध्याकाळी 6.15)महिलांची 3000 मीटर वैयक्तिक पर्स्युट पात्रता: मीनाक्षी ( दुपारी 2.30- संध्याकाळी 6.15 वाजता)पुरुषांची केरिन पहिली फेरी: एसो अल्बेन (8.30 - 11.30 वाजता)

वेटलिफ्टिंगपुरुष 55 किलो: संकेत सरगर (दुपारी 1.30 वाजता)पुरुष 61 किलो: गुरुराजा (दुपारी 4.15 वाजता)महिला 49 किलो: मीराबाई चानू (रात्री 8 वाजता)महिला 55 किलो: एस. बिंदयाराणी देवी (रात्री 12:30 वाजता)

लॉन बॉलपुरुषांची तिहेरी: भारत वि माल्टा (दुपारी 1- संध्याकाळी 6.15 वाजता)महिला एकेरी: तानिया चौधरी विरुद्ध लॉरा डॅनियल्स (वेल्स): दुपारी 1 ते 6.15 वाजता.पुरुषांची जोडी: भारत वि कुक आयलंड्स (संध्याकाळी 7.30 - दुपारी 12.45)महिला चार: भारत विरुद्ध कॅनडा (संध्याकाळी 7.30 - दुपारी 12.45)

अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्सपुरुषांची मॅरेथॉन फायनल: दुपारी 1.30 वाजता

हे देखील वाचा-