Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने आणखी दोन पदकं जिंकली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताचे बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन आणि रोहित टोकस यांनी कांस्य पदकांची (Bronze medal for india) कमाई केली आहे. 


बॉक्सर जॅस्मिन सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्याचप्रमाणे मोहम्मद हुसामुद्दीन (Mohammed Hussamuddin) आणि रोहित टोकस (Rohit Tokas) यांनाही पराभूत झाल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. यामध्ये मोहम्मद याला 57 किलो वजनी गटात घानाच्या जोसेफ कॉमेने 1-4 च्या फरकाने मात दिली. तर दुसरीकडे रोहित टोकसला 3-2 च्या फरकाने 67 किलो वजनी गटात झाम्बियाच्या स्टेफन झिंबाने पराभूत केलं. 



अमित-नीतूचं पदक निश्चित


जॅस्मिनसह मोहम्मद आणि रोहित पराभूत झाले असली तरी भारताचा अनुभवी बॉक्सर अमित पांघलने (Amit Panghal) पुरुषांच्या फ्लाईवेट कॅटेगरीत 48 ते 51 किलो वजनी गटात सेमीफायनलचा सामना जिंकत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्याने जॉम्बियाचा बॉक्सर पॅट्रिक चिनयेम्बा याला 5-0 च्या फरकाने मात देत अंतिम फेरीत झेप घेतली आहे. ज्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. पुरुषांसह महिलांच्या  45 ते 48 किलो वजनी गटात भारताच्या नीतू घंघासने (Neetu Ghanghas) कॅनडाच्या प्रियांका ढिल्लोंला मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील भारताचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे. 


 हे देखील वाचा-