CWG 2022 : भारताच्या कुस्तीपटूंनी कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) शुक्रवारी तब्बल सहा पदकांना गवसणी घातल्यानंतर आजही पदकांचा पाऊस पाडणं कायम ठेवलं आहे. नुकताच भारताचा कुस्तीपटू दीपक नेहरा आणि महिला कुस्तीपटू पुजा सिहागने कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे तीन सुवर्णपदकांसह आज भारताने तीन कांस्यपदकंही कुस्तीत जिंकली आहेत. यामुळे केवळ कुस्ती खेळात भारताच्या नावावर 12 पदकं झाली आहेत.


पुजाने 76 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुनीला 11-0 ने मात देत कांस्यपदक जिंकलं आहे. तर दीपक नेहरा याने 97 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या तयाब रझा याला पराभूत करत कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. 


भारताचं कुस्ती स्पर्धेत 12 वं पदक


भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये एका मागे एक पदकं जिंकत आहेत. शुक्रवारी 6 पदकं जिंकल्यानंतर आजही सहा पदकांना गवसणी घातली आहे. शुक्रवारी अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर आज पुजा गेहलोट आणि आता दीपक नेहरा आणि पुजा सिहागने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. दुसरीकडे रवी दहिया, विनेश फोगाटसहनवीननं सुवर्णपदक जिंकलं आहे. 








हे देखील वाचा-