एक्स्प्लोर
Advertisement
'या प्रशिक्षकाला फिटनेसची गरज', विनोद कांबळीचा रवी शास्त्रीला टोमणा
'या प्रशिक्षकाला खरंच फिटनेसची गरज आहे.' असं म्हणत विनोदने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे.
मुंबई : द. आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावलेल्या टीम इंडियावर सध्या जोरदार टीका सुरु आहे. तिसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची कामगिरी म्हणावी तशी होत नसल्याने क्रिकेट चाहतेही नाराज आहेत. याचवेळी भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना सोशल मीडियावरुन टोमणा लगावला आहे.
'या प्रशिक्षकाला खरंच फिटनेसची गरज आहे.' असं म्हणत विनोदने हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.
दरम्यान, या ट्वीटवर अनेक ट्वीपल्सनं विनोद कांबळीवरच निशाणा साधला. 'रवी शास्त्री हे एक दिग्गज क्रिकेटर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशी टिप्पणी करणं योग्य नाही.' असा सल्ला एका यूजरनं विनोदला दिला. तर काही ट्विपल्सने कांबळीने नोंदवलेलं निरीक्षण योग्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यानिमित्ताने प्रशिक्षकांच्या फिटनेसबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. विनोद कांबळीने भारताचं प्रतिनिधीत्व करताना 17 कसोटी सामन्यात 1084 धावा केल्या आहेत. तर 104 वनडेत 2477 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. संबंधित बातम्या : जोहान्सबर्ग कसोटीवर पकड घेण्यासाठी टीम इंडियाचा कठोर संघर्षThis coach really needs Fitness???????????????????????????????????? pic.twitter.com/ObyRlpVPzD
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) January 25, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement