एक्स्प्लोर

भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघात

जमैका : 9 जुलै रोजी भारताविरोधात होणाऱ्या एकमेव ट्वेण्टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची विंडीज संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना गेलचा जलवा पाहायला मिळणार आहे. गेल मागील काही काळापासून संघातून बाहेर होतो. त्याने आपला अखेरचा ट्वेण्टी-20 सामना एप्रिल 2016 मध्ये खेळला होता. क्रिकेट वेस्ट इंडिजचे संचालक कर्टनी ब्राऊनने गेलच्या कमबॅकची माहिती दिली आणि निर्णयाचं स्वागतही केलं. ब्राऊन म्हणाले की, "टी-20 संघात खिस गेलच्या पुनरागमनाचं स्वागत करतो. गेल या फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. गेलच्या कमबॅकमुळे संघाला बळकटी मिळेल. गेलकडे घरच्या मैदानावर जगातील सर्वात मजबूत संघाविरोधात आपली शक्ती दाखवण्याची संधी असेल." "टी-20 संघ संतुलित दिसत आहे. संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचं मिश्रण आहे. युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी असेल. तर युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंकडून शिकता येईल," असंही कर्टनी ब्राऊन म्हणाले. गेलने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 50 ट्वेण्टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान गेलने 35.32 च्या सरासरीने आणि 145.49 च्या स्ट्राईक रेटने 1,519 धावा केल्या आहेत. गेलने 2 शतकं आणि 13 अर्धशतकं ठोकली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 आहे. गेलशिवाय संघात कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, मार्लन सॅमुअल्स आणि जेरॉम टेलरचाही समावेश करण्यात आला आहे. 9 जुलैला भारत-वेस्ट इंडिज सामना भारत आणि वेस्ट इंडिज संघातील एकमेव टी-20 सामना 9 जुलै रोजी खेळवण्यात येईल. नुकत्यानुकत्याच अफगाणिस्तानविरोधातील 3 सामन्याच्या टी-20 मालिकेत गेलला वगळण्यात आलं होतं. आता त्याला लेंडल सिमन्सच्या जागी घेण्यात आलं आहे. अफगाणिस्तानविरोधातील मालिकेत सिमन्सची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याने 3 सामन्यांमध्ये अनुक्रमे 6, 17 नाबाद आणि 15 धावा केल्या होत्या. त्यामुळे सिलेक्टर्सकडे गेलशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget