पॅरिस : पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक (Paris Olympic) स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे पदकाच्या कमाईसाठी या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक खेळाडू जीवाची बाजी लावतोय. प्रत्येकालाच या स्पर्धेत पदक हवे आहे. पण प्रत्येकाच्या नशिबात हे पदक नाही. टॉपच्या तीनच खेळाडूंना सूवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं दिली जातात. दरम्यान, चीनच्या एका महिला खेळाडूला मात्र लॉटरी लागली आहे. या खेळाडूला सुवर्णपदक तर मिळालेच आहे. पण पॅरिसमधील ऐतिहासिक ऑलिम्पिक स्पर्धेत तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. या खेळाडूच्या बॉयफ्रेंडने तिला सर्वांसमक्ष लग्नासाठी मागणी घातली आहे.
सोबतच्या बॅडमिंटनपटूनेच ठेवला लग्नाचा प्रस्ताव
चीनची बॅडिंटनपटू हुआंग या कियोंग हिने शुक्रवारी मिक्स्ड डबल्स या खेलप्रकारात सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यावर संबंधित खेळाडूचा त्या देशात मोठा सत्कार केला जातो. त्या खेळाडूची देशभरात वाहवा होते. विशेष म्हणजे एकदा पदक मिळाल्यावर संबंधित खेळाडूलाही विजयाचा आनंद गगनात मावत नाही. पण हुआंग या कियोंग या खेळाडूला सुवर्णफदकासोबतच आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. पदक मिळताच तिला थेट लग्नाचा प्रस्ताव मिळाला आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चीनच्याच लि युचेन या बॅडमिंटनपटूने हुआंग या कियोंगला लग्नाची मागणी घातली आहे.
लग्नाचा प्रस्ताव मिळाल्यानंतर लियोंग काय म्हणाली?
विशेष म्हणजे थेट मैदानातच आलेली ही लग्नाची मागणी लियोगंने स्वीकारली आहे. लग्नाचा हा प्रस्ताव माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. कारण मी स्पर्धेच्या तयारीत गुंतलेली होते. मी ऑलिम्पिक चॅम्पियन झाले अन् आता मला लग्नाचा प्रस्ताव मिळालाय. हा लग्नाचा प्रस्ताव मला अनपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया लियोंगने दिलीय.
भारतीय हॉकी संघाला इतिहास घडवण्याची संधी
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहभाग घेतला आहे. भारताला यावेळी हॉकी या खेळप्रकारात चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. भारत आता उपांत्यपूर्व फेरीत धडकला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव करून भारताने ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा :
IND vs SL : श्रीलंकेच्या युवा खेळाडूनं खेळ बिघडवला, भारत विजयापासून दूर कसा राहिला? जाणून घ्या कारणं