Friendship Day 2024 : ही दोस्ती तुटायची नाय... तेरे जैसा यार कहा...मेरी दोस्ती मेरा प्यार... मैत्रीवर अशी अनेक गाणी विविध चित्रपटात दाखवण्यात आली आहेत. आपल्या जीवनात मित्रांची मोठी भूमिका असते. आपण बिनधास्तपणे आपले विचार त्यांच्याशी शेअर करू शकतो. त्यामुळे आपले मन हलके होते. हे नातं असं आहे, जे रक्ताचं नसूनही अगदी आपलेसे करते, याच मैत्रीचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मैत्रीदिन, ज्याला इंग्रजीत फ्रेंडशिप डे असं म्हणतात. फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा 4 ऑगस्टला हा दिन साजरा करण्यात येणार आहे, लहान असताना या दिवशी मित्र-मैत्रीणींना बँड किंवा चॉकलेट्स भेट द्यायचो. त्याचप्रमाणे, या फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला खास वाटण्यासाठी त्यांना सरप्राईज प्लॅन देऊ शकता. कसं ते जाणून घ्या...


 


आयुष्यात मित्र खूप खास असतात



आपल्या आयुष्यातील अनेक नाती रक्तावर आधारित असतात तर अनेक नाती आपण स्वतः निवडतो. त्यातीलच एक नाते आहे मैत्रीचे. लहानपणापासून आपण शाळा, कॉलेज, ऑफिस, इतर शहरात किंवा इतर कुठेही गेलो तरी अनेकजण आपले मित्र बनतात. त्यातले काही मित्र खूप खास असतात. कधी कधी हेच मित्र आपल्याला कुटुंबातील सदस्यासारखे वाटतात.


 


फ्रेंडशिप डे ला 'असं' द्या सरप्राईज!



आपल्या जीवनात मित्रांची मोठी भूमिका असते. आपण बिनधास्त कसलाही विचार न करता आपले विचार त्यांच्याशी शेअर करू शकतो. त्यामुळे आपले मन हलके होते. पण आजकाल आपण सगळे आपापल्या कामात इतके व्यस्त झालो आहोत की, एकमेकांना भेटायला वेळच मिळत नाही. आपण फक्त मोबाईलवर बोलतो, पण कधी कधी त्यासाठी वेळही मिळत नाही. त्यामुळे, समोरच्या व्यक्तीला असे वाटते की, तुम्ही त्यांच्यापासून दुरावला आहात. मात्र अशावेळी तुम्ही तुमच्या मित्राला फ्रेंडशिप डे निमित्त खास अनुभव देऊ शकता. अशा सरप्राईज प्लॅन करून तुम्ही त्यांना आनंद देऊ शकता.


 


गिफ्ट द्या


लहानपणी आम्ही सर्वजण फ्रेंडशिप डेला मित्रांना बँड किंवा चॉकलेट गिफ्ट करायचो. अशा मित्राला खास वाटण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याला भेटवस्तू देणे. आपल्या मित्राच्या आवडीनिवडी आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना काहीतरी छान भेट देऊ शकता. विशेषत: तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असल्यास, तुम्ही ऑनलाइन भेटवस्तू पाठवू शकता. तुम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, पोशाख, दागिने किंवा काही खाद्यपदार्थ भेट देऊ शकता.


 





एक स्व-लिखित पत्र द्या


तुमच्या मित्राला विशेष वाटण्यासाठी, त्यांना एक स्व-लिखित पत्र पाठवा. ग्रीटिंग कार्डद्वारे किंवा आपल्या स्वत: च्या हातांनी कार्ड बनवून भेट देऊ शकता. तुम्ही त्यांना सोशल मीडियावर टॅग करू शकता आणि त्यांचे चित्र शेअर करू शकता, तसेच त्यांच्यासाठी स्तुतीचे दोन शब्द लिहू शकता. जे पाहून त्यांचे मन प्रसन्न होईल.


 


एखादी ट्रीप प्लॅन करा


तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला मित्रांना भेटायला वेळ मिळत नसेल, तर त्यांच्यासोबत फिरण्याचा प्लॅन करा. तुम्ही 2 ते 3 दिवस सहलीला जाऊ शकता. याशिवाय, तुम्ही एका दिवसात जवळपासच्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि लंच किंवा डिनर एकत्र करू शकता


 


हेही वाचा>>>


Friendship Day 2024 Wishes : 'रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती 'मैत्री'!' फ्रेंडशिप डे येतोय, मित्रपरिवाराला शुभेच्छा संदेश पाठवून दिवस बनवा खास..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )