Rohit Sharma : श्रीलंकेनं चांगला खेळ केला, भारताची बाजू वरचढ होती पण... विजयाची संधी हुकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
भारतानं आक्रमक सुरुवात केली होती. 75 धावांची सलामीची भागिदारी केल्यानंतर देखील 231 धावा करण्यात भारतीय संघाला अपयश आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मा म्हणाला श्रीलंकेनं विजयासाठी दिलेली धावसंख्या गाठता आली असती. आम्हाला तिथं चांगल्या फलंदाजीची गरज होती. आम्ही काही टप्प्यांमध्ये चांगली फलंदाजी केली.
आमच्याकडे मॅचमध्ये वर्चस्व मिळवण्याची संधी होती. आम्ही विकेट गमावल्या, राहुल आणि अक्षरच्या भागिदारीनं मॅचमध्ये पुनरागमन केलं होतं, असं रोहित शर्मा म्हणाला.
शेवटी काही निराशा करणाऱ्या गोष्टी घडल्या, श्रीलंकेनं चांगला खेळ केला. आजचा निकाल त्यामुळं योग्य आहे. या खेळपट्टीवर तुम्ही फलंदाजीला या आणि फटके मारा असं होत नाही, असंही रोहित शर्मा म्हणाला. दोन्ही बाजूनं वेगवेगवळ्या वेळी मॅच झुकली होती, आम्हाला ती एक रन करायला पाहिजे होती, असं रोहित शर्मा म्हणाला.
श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं 30 धावा देत तीन विकेट घेतल्या. तर वानिंदू हसरंगा यानं 58 धावा देत 3 विकेट घेतल्या.
श्रीलंकेचा संघ मॅच टाय करण्यात यशस्वी ठरला. 15 बॉलमध्ये एका रनची गरज असताना भारतीय संघाला त्या करता आल्या नाहीत यामुळं कॅप्टन रोहित शर्मा निराश झाला.