IND vs AUS : 52 वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताच्या हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं इतिहास रचला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा भारतानं 3-2 असा पराभव केला. भारतानं या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारत उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटन आणि जर्मनी यांच्यातील विजयी संघासोबत खेळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरा विजय मिळवला.भारतानं न्यूझीलंड, आयरलँड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. अर्जेंटिनाविरुद्ध भारताचा सामना बरोबरीत सुटला.
भारतानं आज ऑस्ट्रेलियाला 3-2 अशा गोलनं पराभूत करत इतिहास रचला. भारतानं ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला तब्बल 52 वर्षानंतर पराभूत केलं.
भारतानं 1972 मध्ये ऑस्ट्रेलियाला 3-1 अशा फरकानं पराभूत केलं होतं. भारतानं ऑस्ट्रेलियाला 52 वर्षापूर्वी 30 ऑगस्ट 1972 रोजी पराभूत केलं होतं.
भारताकडून पहिला गोल अभिषेकनं 12 व्या मिनिटाला गेला. त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर 20 व्या मिनिटाला केला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रेग थॉमसनं गोल केला.
हरमनप्रीतनं 32 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. यानंतर ऑस्ट्रेलियानं पेनल्टी स्ट्रोकवर केला. ऑस्ट्रेलियानं बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत उशीर झाला होता.