(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chess Olympiad 2022 : ग्रँडमास्टर रौनक साधवानीचा दमदार विजय, युएईच्या अब्दुल रेहमानला दिली मात
FIDE Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या सामन्यांना आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी भारताच्या रौनक साधवानीने युएईच्या अब्दुल रेहमानला मात दिली आहे.
Grandmaster Raunak Sadhwani Win : बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली जात आहे. दरम्यान या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने (Grandmaster Raunak Sadhwani) युएईच्या अब्दुल रेहमानला मात दिली आहे. या विजयासोबत रौनकने पहिला राऊंड पार करत पुढच्या राऊंडमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 (Chess Olympiad 2022) मागील दोनही वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली ही स्पर्धा यंदा ऑफलाईन चेन्नईत पार पडत आहे. बुद्धिबळमधील अव्वल दर्जाचे संघ रशिया आणि चीन या स्पर्धेत नसताना भारताला अधिक विजय मिळवण्याची संधी आहे. यावेळी खुल्या आणि महिला गटात भारताचे अ, ब आणि क असे तीन संघ सामिल झाले आहेत. चेन्नई, तामिळनाडू येथील ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या शेरेटन महाबलीपुरम रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे सामने खेळवले जात असून सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे दूरदर्शनवर होणार असून Chessbase India and FIDE या युट्यूब चॅनेल्सवरही मोबाईलद्वारे तुम्ही सामने पाहू शकता.
कसा आहे भारतीय संघ?
'अ' खुला गट | 'ब' खुला गट | 'क' खुला गट |
विदित गुजराथी | डी. गुकेश | सूर्यशेखर गांगुली |
पी. हरिकृष्ण | आर. प्रज्ञानंद | एस. पी. सेतुरामन |
अर्जुन इरिगसी | निहाल सरिन | अभिजित गुप्ता |
के. शशिकिरण | रौनक साधवानी | कार्तिकेयन मुरली |
एसएल नारायणन | बी. अधिबन | अभिमन्यू पुराणिक |
कसा आहे भारतीय संघ?
'अ' महिला गट | 'ब' महिला गट | 'क' महिला गट |
डी. हरिका | सौम्या स्वामीनाथन | इशा करवडे |
कोनेरू हम्पी | वांटिका अगरवाल | साहिथी वर्षिनी |
आर. वैशाली | मेरी अॅन गोम्स | पी. व्ही. नंधिधा |
भक्ती कुलकर्णी | पद्मिनी राऊत | प्रत्युशा बोड्डा |
तानिया सचदेव | दिव्या देशमुख. | विश्वा वस्नावाला |
हे देखील वाचा-