एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सीएसकेला पहिल्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डग बॉलिंजरने सोमवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डग बॉलिंजरने सोमवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय बॉलिंजर त्याच्या स्विंगसाठी ओळखला जातो.
बॉलिंजरने ऑस्ट्रेलियाकडून 12 कसोटी सामन्यांमध्ये 25.9 च्या सरासरीने 50, 39 वन डे सामन्यात 23.9 च्या सरासरीने 62 विकेट घेतल्या आहेत. तर 9 टी-20 सामन्यांमध्येही ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. न्यू साऊथ वेल्सकडून त्याने 124 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 411 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएलमधील कामगिरीमुळे बॉलिंजरला भारतीय प्रेक्षक ओळखतात. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आवडत्या गोलंदाजांपैकी तो एक होता. बॉलिंजरच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सीएसकेनेही त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर 2010 सालच्या अंतिम सामन्यातील एक झेल घेतलेला व्हिडीओ शेअर केला आहे. गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही बॉलिंजरने चांगलं योगदान दिलं होतं. युसूफ पठाणचा झेल घेतलेला हा व्हिडीओ आहे. पाहा व्हिडीओ :"Doug Bollinger gave it all with every ball he bowled." Can't agree more. The 4/13 against DC in the 2010 @IPL semi-final was a vital cog in the wheel. That catch off Yusuf Pathan would be etched in every yellow fan's heart! #ThankYouDoug for all the amazing memories! 🦁💛 https://t.co/0Dsh94qY1D
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 5, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement