Mohammed Shami : येत्या रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी आयीसीस चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy 2025) महामुकाबला आहे. या अंतिम सामन्यात भारत आणि न्युझीलंड यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. त्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकतीने तयारीला लागली आहे. पण याच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहोम्मद शमी मात्र टीकेचा धनी बनला आहे. रमजानचा पवित्र महिना चालू असताना त्याने रोजा न ठेवल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. मात्र याच भारताच्या ढाण्या वाघाची पाठराखण करण्यासाठी ज्येष्ट गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) पुढे आले आहेत.
मोहोम्मद शमी गुन्हेगार
जावेद अख्तर यांनी मोहोम्मद शमीवर टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. तसेच त्यांनी मोहोम्मद शमीची पाठराखण केली असून त्याला भारतासाठी खेलण्यास प्रोत्साहित केलंय. मोहोम्मद शमीने रोजा न ठेवल्यामुळे त्याच्यावर अनेकजण टीका करत आहेत. सोबतच ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी तर शमीला थेट 'गुन्हेगार' म्हटलं आहे. अशा स्थितीत जावेद अख्तर यांनी पुढे येत मोहोम्मद शमीची पाठराखण केली आहे. तसेच शमीला ट्रोल करणाऱ्यांची शाळा घेतली आहे.
जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले?
जावेद अख्तर यांनी याआधीही देशातील वेगेवगळ्या घटनांवर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. शमीवर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या एक्स खात्यावर शमीची पाठराखण केली आहे. "शमी साहेब, तुम्ही मूर्ख कट्टरपंथी लोकांकडे लक्ष देऊ नका. दुबईत दुपारी कडक ऊन असते. अशा स्थितीत तिथे क्रिकेटच्या मैदानावर पाणी पिल्यामुळे या लोकांना त्रास होत आहे. जो भारतीय संघ संपूर्ण देशाची मान उंच करतो, त्याच टीमचा तुम्ही एक भाग आहात. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत तसेच भारतीय टीमसोबत आहेत," असे जावेद अख्तर यांनी म्हटलंय.
मोहोम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात का सापडला?
चार मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्य भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताचा विजय झाला. सामना चालू असताना मोहोम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिताना दिसला. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या स्तरातून ट्रोल करण्यात आलं. मौलाना बरेवली यांनी तर शमीने रोजा न ठेवून गु्न्हा केला आहे. त्यामुळे त्यांना या गु्न्ह्याबाबत खुदाकडे उत्तर द्यावे लागेल. शमीच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे, असं बरेवली यांनी म्हटलंय. या वादावर शमी यांचे चुलत भाऊ डॉ. मुमताज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मोहोम्मद शमी देशासाठी खेळत आहे. असे असताना रोजा न ठेवल्यामुळे त्याला दोषी ठरवणं हे फारच लाजीरवाणं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :