Meenakshi Shirodkar: बिकिनी किंवा स्वीमसूट परिधान करून चित्रपटासाठी शूटिंग करणे आजकाल सामान्य बाब झाली आहे. जवळजवळ सर्वच अभिनेत्रींनी चित्रपटाच्या कथेसाठीची गरज म्हणून बिकिनी परिधान केलेली आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, उर्वशी रौतेला यासारख्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र सिनेसृष्टीत बिकिनी परिदान करण्याचा ट्रेंड कधीपासून चालू झाला? सिनेसृष्टीत सर्वप्रथम बिकिनी कोणी परिधान केली होती? असे अनेक प्रश्न बऱ्याच सिनेरसिकांना पडतात. याच प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊ या..


सिल्व्हर स्क्रिनवर उडवून दिली खळबळ


भारतीय सिनेसृष्टीत अगदी कृष्णधवल चित्रपट होते, तेव्हापासून अनेक अभिनेत्रींनी बिकिनी किंवा स्वीमसूट परिधान केलेला आहे. 60 आणि 70 च्या दशकात अभिनेत्री शर्मिला टागोर, झिनत अमान यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनी तर त्या काळात बिकिनी परिधान करून सिल्व्हर स्क्रीनवर धमाल उडवून दिली होती. मात्र भारतीय सिनेमाच्या इतिहासात या दोन अभिनेत्रींच्या अगोदरही एका अभिनेत्रीने स्वीमसूट परिधान करून खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे ही अभिनेत्री मराठमोळी असून ती 90 च्या दशकातील दोन दिग्गद अभिनेत्रींची आजी आहे. 


1938 साली परिधान केली बिकिनी


या अभिनेत्रीचे नाव मिनाक्षी शिरोडकर असे आहे. त्यांचा 1938 साली ब्रह्मचारी नवाचा मराठी चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांनी स्वीमसूट परिधान केला होता.  त्यांनी 'यमुना जळी खेळू खेळ' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान स्वीमसूट परिधान रून शूटिंग केले होते. त्या काळात स्वीमसूट परिधान केल्यामुळे त्यांची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती. या गाण्यात त्या अभिनेता मास्टर विनायक यांच्यापुढे स्वीमसूट परिधान करून पाण्यात नृत्य करताना दिसतात. 


स्वीमसूट करून केलं शूटिंग 


त्या काळात तोकडे कपडे परिधान करणे म्हणजे फारच अचंबित करणारी बाब मानले जायचे. अशा स्थितीत मिनाक्षी शिरोडकर यांनी चक्क स्वीमसूट परिधान करून चित्रपटासाठी शूटिंग केले होते. दुसरीकडे हिंदी सिनेमामध्ये नलिनी जयवंत यांनी सर्वांत अगोदर बिकिनी परिधान केली होती. त्यांनी संग्राम या चित्रपटासाठी 1950 साली बिकिनी घालून शूटिंग केले होते.  


ब्रह्मचारी हा पहिला चित्रपट


मिनाक्षी शिरोडकर ही अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर यांची आजी आहे. लग्नाआधी त्यांचे नाव रतन पेडणेकर असे होते. त्यांचा विवाह नंतर डॉ. शिरोडकर यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी आपले नाव बदलून मिनाक्षी असे केले. ब्रह्मचारी हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांना एक मुलगा होता. या मुलाला नंतर नम्रता आणि शिल्पा शिरोडकर अशा दोन मुली झाल्या. 



हेही वाचा :


Nana Patekar : मोठी बातमी : अभिनेते नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी दिलासा, अंधेरी कोर्टाचा मोठा निर्णय


Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली


गुलाबी आँखें जो तेरी देखीं.. अभिनेत्री पूजा सावंतचा गुलाबी अंदाज; पाहा फोटो!