एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Wimbledon Final 2024: जोकोविचचे स्वप्न पुन्हा भंगले, कार्लोस अल्काराझनं विम्बल्डनवर पुन्हा नाव कोरले

Carlos Alcaraz Wins Wimbledon Final : विम्बल्डन चषकात यंदा सलग दुसऱ्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. कार्लोसनं जोकोविचला 6-2, 6-2, 7-5 नं पराभव केला. 

Wimbledon 2024 Winner: आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याला विम्बल्डनच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. 21 वर्षीय कार्लोस अल्काराझ याने  जोकोविचचा पराभव करत ग्रँडस्लॅम जिंकले. अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने विम्बल्डन चॅम्पियनशीप 2024 वर नाव कोरले. रविवारी (14 जुलै) झालेल्या फायनल सामन्यात अव्वल स्थानावर असणाऱ्या कार्लोस अल्काराझ याने अनुभवी नोव्हाक जोकोविच याचा पराभव केला. 3 सेटपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात कार्लोस अल्कारेज याने विजय मिळवला.

विम्बल्डन चषकात यंदा सलग दुसऱ्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. कार्लोसनं जोकोविचला 6-2, 6-2, 7-5 नं पराभव केला. केवळ 21 व्या वर्षी त्यानं हे यश मिळवलंय. 24 वेळा ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या नोव्हाक जोकोविचला गतवर्षी झालेल्या  विम्बल्डन फायनलमध्ये कार्लोस अल्काराझनं पराभूत केले होते. यंदाही कार्लोस अल्काराझनं विम्बल्डनवर नाव कोरलेय. विम्बल्डनचे खिताब सलग दोन वेळा मिळवणारा इतिहासात तो केवळ तिसरा खेळाडू आहे. 

कार्लोस अल्काराझने 2024 विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचविरुद्ध पहिल्या दोन सेटमध्ये निर्वादित वर्चस्व राखले होते. कार्लोसने पहिले दोन सेट  6-2, 6-2 आशा फरकाने सहज जिंकले होते. पण तिसऱ्या सेटसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, ज्यामध्ये 21 वर्षीय कार्लोसने कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.   

रॉजर फेडररची बरोबरी -

कार्लोस अल्काराझ याने चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावत महान टेनिसपटू रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. फेडररनंतर कार्लोस अल्काराझ यालाच आपल्या कारकिर्दीतील पहिले चार ग्रँडस्लॅम अंतिम सामने जिंकणारा खेळाडू ठरला आहे. कार्लोसने आतापर्यंत दोनदा विम्बल्डन, एकदा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली आहे आणि चारही वेळा जिंकला आहे.

कोण आहे कार्लोस अल्काराझ ?

स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ हा स्पेनमधील एल पालमार या गावातील रहिवाशी आहे. त्याचा जन्म 5 मे 2003 मध्ये झाला. अल्कारेझचे वडील टेनिसचे धडे द्यायचे, त्यांच्या अॅकॅडमीमधूनच अल्कारेझनं टेनिसचे धडे गिरवले. त्यानं अनेक स्पॅनिश आणि युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. अल्काराझनं त्याचा पहिला एटीपी सामना रामोस विनोलास विरुद्ध जिंकला होता, तेव्हा अल्कारेझ अवघ्या 16 वर्षांचा होता. जगातील नंबर एकचा माजी खेळाडू जुआन कार्लोस फेरेरो त्याचा ट्रेनर आहे. फरेरो 15 व्या वर्षापासूनच फेरेरोसोबत टेनिसचा सराव करत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 6.30 AM 09 October 2024ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 7 AM 09 October 2024Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
Embed widget