एक्स्प्लोर
रणजी सामन्यादरम्यान कार थेट मैदानात घुसली!
दिल्लीतील पालम मैदानावर सुरु असलेल्या उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या रणजी सामन्यात एक व्यक्ती चक्क आपली कार घेऊन आत घुसल्याची घटना घडली.
नवी दिल्ली : दिल्लीतील पालम मैदानावर सुरु असलेल्या उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या रणजी सामन्यात एक व्यक्ती चक्क आपली कार घेऊन आत घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेनं गंभीर आणि इशांतसह सर्वच खेळाडू चकीत झाले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळ आधी गिरीश शर्मा नावाचा एक व्यक्ती आपली वॅगन आर कार घेऊन थेट मैदानात घुसला. इतकंच नव्हे तर तो कार घेऊन थेट खेळपट्टीवरच गेला. कार खेळपट्टीवर येत असल्याचं पाहून सर्वच खेळाडू अवाक् झाले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत गिरीश शर्मानं नंतर स्पष्टीकरणही दिलं. 'मी रस्ता चुकल्यानं थेट मैदानात घुसलो होतो. मैदानाबाहेर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे मला अंदाज आला नाही की मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर रणजी सामना खेळत आहेत.’
खेळपट्टीवर कार येत असल्याचं पाहून इशांतसह अनेक खेळाडूंनी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला. पण तोवर गिरीशनं खेळपट्टीवरुन दोन फेऱ्या मारल्या होत्या. या संपूर्ण प्रकारानंतर मॅच रेफ्रीनं तिसरा दिवसाचा खेळ थांबवला. आता उद्या (शनिवार) 9.15 मिनिटांनी पुन्हा खेळ सुरु केला जाईल.
मात्र, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटर सामना खेळत असतानाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement