एक्स्प्लोर
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बुमराह बाहेर?
याआधी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. अशातच बुमराहच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे.
मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बोटाला झालेल्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला बुमराह मुकण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये जसप्रीत बुमराहच्या बोटाची सर्जरी करण्यात आली. परंतु ही सर्जरी यशस्वी झाली नसल्याची माहिती आहे. बुमराहला या दुखापतीतून सावरण्यासाठी एक महिना लागू शकतो. त्यामुळे बुमराह या मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
याआधी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. अशातच बुमराहच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे.
आयर्लंडविरुद्ध 27 जूनला झालेल्या पहिल्या टी-ट्वेण्टी सामन्यात गोलंदाजी करताना बुमराहला दुखापत झाली. त्यानंतर जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेण्टी आणि वनडे मालिकेला मुकावं लागलं.
दरम्यान, दुखापतग्रस्त असतानाही इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बुमराहची भारतीय संघात निवड करण्यात आली होती.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्राईम
क्रिकेट
राजकारण
Advertisement