एक्स्प्लोर

कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारी

भुवनेश्वरच्या मेरठमधील घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मेरठमधील एका हॉटेलवर मेहंदी समारंभ पार पडला.

नवी दिल्ली: टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची ‘लग्नघटिका’ समीप आली आहे. उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला भुवी त्याची बालमैत्रीण नुपूर नागरशी लग्नबंधनात अडकणार आहे. भुवनेश्वरच्या मेरठमधील घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मेरठमधील एका हॉटेलवर मेहंदी समारंभ पार पडला. 5 फेब्रुवारी 1990 रोजी जन्मलेला भुवनेश्वर 27 वर्षांचा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 8 विकेट्स घेणारा भुवनेश्वर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र आता उर्वरित दोन कसोटीत तो खेळू शकणार नाही. एकीकडे लगीनघाई सुरु असूनही, भुवनेश्वर पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरलाच, शिवाय त्याने सर्वोच्च परफॉर्मन्स देत, टीम इंडियाला या कसोटीवर वर्चस्व गाजवण्याची संधी दिली. भुवनेश्वर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त होता, तर दुसरीकडे त्याच्या लग्नपत्रिका वाटण्याचं काम सुरु होतं. भुवनेश्वरची आई इंद्रेश देवी लेकाच्या लग्नाच्या आनंदात न्हाऊन गेल्या आहेत. संगीत सोहळ्यात त्यांनीही ठेका धरुन आपला आनंद साजरा केला. https://twitter.com/BhuviOfficial/status/915995449533767680 तर पोराच्या लग्नाच्या तयारीत वडील किरणपाल सिंह हे न थकता पाहुणे-रावळ्यांची यादी बनवण्यात व्यस्त आहेतच, शिवाय मुलाच्या तयारीतही ते हिरीरीने सहभागी होत आहेत. कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी भुवनेश्वरसाठी कोलकात्यावरुन शेरवानी, तर जयपूरवरुन मोजडी मागवण्यात आल्याचं, किरणपाल सिंह यांनी सांगितलं. तर भावाच्या लग्नासाठी भुवीची बहीणही खूपच तयारीत आहे, त्यासाठी तीने भुवनेश्वरसाठी दिल्लीवरुन फेटा आणला आहे. लग्नसोहळा भुवनेश्वरच्या लग्नसोहळा आजपासूनच सुरु झाला आहे. आज गीत-संगीत आणि मेहंदी समारंभ झाला. तर उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला 10 वाजता भुवनेश्वरची घोड्यावरुन वरात निघेल, ती लग्नमंडपापर्यंत जाईल. लग्नमंडपात लग्नाचे विधी पार पडतील. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. कोण आहे नुपूर : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची होणारी पत्नी नुपूर नोएडामधून बीटेक झाली आहे. नोएडामध्येच ती एका खासगी कंपनीत काम करते. नुपूर आणि भुवनेश्वरचा साखरपुडा 4 ऑक्टोबरला झाला होता. श्रीलंकेविरोधातील उर्वरित 2 सामन्यांना भुवी मुकणार भुवनेश्वरला श्रीलंकेविरोधातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. तामिळनाडूचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकरला भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी देण्यात आली. भारतीय अ संघ आणि तामिळनाडूकडून खेळताना विजय शंकरने दमदार प्रदर्शन केलं आहे. पहिल्या कसोटीत सामनावीर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वरने महत्त्त्वाची भूमिका निभावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही डावात मिळून त्याने आठ विकेट घेतल्या. संबंधित बातम्या तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, धवनच्या प्रश्नाला भुवीचं हटके उत्तर भुवनेश्वर आणि धवनची दुसऱ्या कसोटीतून माघार टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget