Bhagwani Devi : 94 वर्षांच्या आजीबाईंची कमाल, वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकासह कांस्य पदकावर कोरलं नाव
फिनलँडच्या टेम्परे येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये हरियाणाच्या भगवानी देवी यांनी कमाल कामगिरी करत 100 मीटर रेसमध्ये सुवर्ण तर शॉटपुटमध्ये कांस्य पदक मिळवलं आहे.
World Masters Athletics Championship : 'Age is Just Number' या इंग्रंजी वाक्याचा प्रत्यय कधी कधी सत्यात येतो, हाच प्रत्यय हरियाणाच्या 94 वर्षीय भगवानी देवी यांनी आणून दिला आहे. या आजीबाईंनी फिनलँडच्या टेम्परे येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये (World Masters Athletics Championship) सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांना गवसणी घातली आहे. ज्या वयात अनेकांना चालायलाही अवघड पडतं अशामध्ये भगवानी देवी यांनी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. तर शॉटपुट खेळात कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
कशी केली कामगिरी?
या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भगवानी देवी यांनी 100 मीटर स्प्रिंट इव्हेंटमध्ये 24.74 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक मिळवलं. तर दुसरीकडे शॉटपुट म्हणजेच गोळा फेकमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी भगवानी देवी यांनी केलेल्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांचा तिरंग्याच्या रंगाच्या जर्सीमधील मेडलसोबतचा फोटो व्हायरल हो असून मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सनेही ट्वीटकरत भगवानी देवी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
India's 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.🥇She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!👏 pic.twitter.com/Qa1tI4a8zS
हे देखील वाचा-
- Wimbledon 2022 Final : रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद
- Kapil Dev on Virat Kohli : विराटचं प्रदर्शन खास नाही, अशात दमदार युवा खेळाडूंना बाहेर बसवणं योग्य नाही : कपिल देव
- India vs Rest of World : भारतीय क्रिकेटपटूंचा सामना जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी, स्वांतत्र्यदिनानिमित्त रंगणार खास सामना, सरकारची बीसीसीआयला मागणी