एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या 500 व्या कसोटी सेलिब्रेशनसाठी अझरुद्दीनला निमंत्रण नाही
नवी दिल्लीः भारताच्या 500 व्या कसोटीच्या निमित्ताने भारताच्या सर्व माजी कर्णधारांना कार्यक्रमासाठी बीसीसीआयकडून निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र यामध्ये केवळ माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश नसेल.
न्यूझीलंडविरुद्ध 22 सप्टेंबरला होणारी टीम इंडियाची ऐतिहासिक कसोटी आहे. भारतीय संघ या कसोटीसोबतच 500 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम करत आहे. ही कसोटी अविस्मरणीय करण्यासाठी बीसीसीआयकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
...म्हणून अझरुद्दीनला निमंत्रण नाही
या खास कार्यक्रमासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंदू बोर्डे, सुनिल गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, के. श्रीकांत, कपिल देव, रवी शास्त्री यांच्यासह अन्य माजी कर्णधारांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर मॅच फिक्सिंगमुळे आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र या प्रकरणात न्यायालयाकडून त्यांची निर्दोष सुटकाही करण्यात आली. तरीही बीसीसीआयने त्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement