एक्स्प्लोर
बीसीसीआय DRSसाठी तयार, पण त्यासाठी काही गोष्टी आवश्यक: ठाकूर
कोलकाता: डीआरएससंबंधी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी काही महत्वपूर्ण संकेत दिेले आहेत. बीसीसीआय डीआरएस लागू करण्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी त्यांनी काही गोष्टींही सुचवल्या आहेत.
पंचाचा वादग्रस्त निर्णयाची समीक्षा करणारी प्रणाली म्हणजेच डीआरएस. त्यामुळे ही प्रणाली तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम असण्याची गरज आहे. असं अनुराग ठाकूर यांचं म्हणणं आहे. 13 ऑक्टोबरला केपटाऊनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ठाकूर यांनी भारत वि. न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटीवेळी अनौपचारिक बातचीत करताना मीडियाला सांगितलं की, "आम्ही पुन्हा एकदा डीआरएसच्या निर्णयाबाबत विचार करीत आहोत. जर हे खरंच संतोषजनक असेल तर बीसीसीआय डीआरएसचा वापर नक्की करेल."
ते म्हणाले की, '21व्या शतकातील या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घ्यायला हवा. जरी यामुळे तंतोतंत निर्णय मिळाला नाही तरी देखील किमान जास्तीत जास्त जवळ जाणारा हवा.' ठाकूर म्हणाले की, भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे हे प्रकरण पाहत आहेत जे आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement