एक्स्प्लोर
श्रीशांतची क्रिकेट खेळण्याची आशा पुन्हा एकदा मावळली
![श्रीशांतची क्रिकेट खेळण्याची आशा पुन्हा एकदा मावळली Bcci Did Not Approve Noc To S Sreesanth To Play In Scotland Cricket League श्रीशांतची क्रिकेट खेळण्याची आशा पुन्हा एकदा मावळली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25111305/sreesanth.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा खेळाडू एस. श्रीशांतची क्रिकेट खेळण्याची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. स्कॉटलंड क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयने त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला आहे.
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीशांतवर क्रिकेट खेळण्यासाठी आजीवन बंदी घातली होती.
दिल्ली पोलिसांनी श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दिल्ली न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण बीसीसीआयने घातलेली बंदी अद्याप कायम आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआय संबंधित कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळण्यास मनाई आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.
श्रीशांतने क्रिकेटनंतर राजकारण आणि सिनेमातही नशिब आजमावलं आहे. केरळ विधानसभेत त्याने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत त्याने 'कॅबरेट' या सिनेमात काम केलं होतं. पण या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही.
श्रीशांत हा राष्ट्रीय क्रिकेट खेळणारा केरळचा दुसराच खेळाडू आहे. त्याने 27 कसोटी सामने, आणि 53 वन डेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 87, तर वन डेत 75 विकेट आहेत. 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7 विकेट घेतल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)