एक्स्प्लोर
दिग्गजांना 128 वर्षात जमलं नाही, बांगलादेशने करुन दाखवलं
क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 128 वर्षात कोणत्याही संघाला जमला नाही. असा विक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे.

ढाका : क्रिकेटच्या इतिहासात गेल्या 128 वर्षात कोणत्याही संघाला जमला नाही. असा विक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे. ढाका येथे सध्या बंगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशचा फलंदाज मोहमदुल्लाह रियादच्या 136 धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने 508 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी बांगलादेशच्या फिरकीपटुंनी विक्रम रचला. फिरकीपटू मेहदी हसन याने 36 धावा देत विंडिजचे 3 फलंदाज टिपले तर शाकिब अल हसन याने 15 धावा देत दोन फलंदाज टिपले. हसन आणि शाकिबने विंडिजच्या पाचही फलंदाजांचा त्रिफळा उडवला. क्रेग ब्रॅथवेट, केरॉन पॉवेल, सुनिल अँब्रिस, रोस्टन चेस, शाय होप हे पाचही फलंदाज त्रिफळाचित झाले आहेत. संघाच्या पहिल्या पाचही फलंदाजांचा त्रिफळा उडवण्याचा विक्रम बांगलादेशने केला आहे. क्रिकेटमध्ये असा विक्रम आतापर्यंत केवळ तीन वेळा झाला आहे. 1890 साली असा विक्रम झाला होता. त्यावेळी पहिले पाचही फलंदाज त्रिफळाचित झाले होते. त्याच्याही काही वर्षे आधी असा रेकॉर्ड इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये झाला होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या 128 असा विक्रम कोणत्याही संघाला करता आला नाही.
आणखी वाचा























