Bajrang Punia Reaction on Vinesh Phogat : कुस्ती सोडून राजकारणात आलेली भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने राजकीय मैदान पण जिंकले आहे. विनेशने हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विनेशच्या विजयाने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. विनेशचे समर्थक आणि चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. यादरम्यान, काँग्रेस नेते आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही विनेशचे निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.  


बजरंग पुनिया यांनी विनेश फोगाटचे केले अभिनंदन


बजरंग पुनियाने आपल्या एक्सवर ट्विट केले आहे. ज्यामध्ये विनेश फोगाटचा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना बजरंग पुनियाने विनेशचे जुलाना विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, "देशाची कन्या विनेश फोगाट हिच्या विजयासाठी खूप खूप अभिनंदन. ही लढाई फक्त पक्षांची नव्हती. किंवा 3-4 उमेदवारांसाठी आणि एका जुलाना जागेसाठी नव्हती, ही लढाई देशातील सर्वात मजबूत दमनकारी शक्तींविरुद्ध होती आणि त्यात विनेश विजयी झाली. "






फायनलमधून अपात्र ठरल्यानंतर विनेशने सोडली कुस्ती 


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटने उपांत्य फेरीपर्यंत दिग्गज कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वीच ती अपात्र ठरली. त्या अंतिम सामन्यात विनेश फोगाट सुवर्णपदक जिंकू शकेल असे सर्वांना वाटत होते. त्यांच्या अपात्रतेमुळे संपूर्ण देश दु:खी झाला होता. यानंतर विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. आणि 6 सप्टेंबर रोजी विनेशने तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


विनेश फोगाटचा जुलानावर शानदार विजय


30 वर्षीय विनेश फोगाटने सासरच्या जुलानावर दणदणीत विजय मिळवला आहे. विनेशने भाजप उमेदवार योगेश कुमार यांचा 6015 मतांनी पराभव केला आहे. विनेश यांना एकूण 65080 मते मिळाली, तर योगेश यांना 59065 मते मिळाली. कुस्तीत हार्टब्रेक झाल्यानंतर राजकारणात विनेशचे नशीब उजळले आहे. त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक जिंकली आहे.


हे ही वाचा -


Vinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; आमदार बनत विधानसभेत झापूक झुपूक एन्ट्री


Haryana Vidhansabha Election Results 2024: काँग्रेसच्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरला; हरियाणातील अनिरुद्ध चौधरी आघाडीवर की पिछाडीवर?


5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती; द. अफ्रिकेचा कोच फिल्डिंगसाठी मैदानात उतरला, झेप घेत चेंडू अडवला, Video