Ajit Pawar on Suraj Chavhan : नुकताच बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi 5) चा ग्रँड फिनाले पार पडला. यंदाच्या पर्वाचा विजेता झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavhan) ठरला. बारामतीच्या (Baramati) सूरजनं अवघ्या महाराष्ट्राच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आणि ट्रॉफिवर आपलं नाव कोरलं. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकर सूरजचं अभिनंदन केलं. अजित पवारांनी सूरजसाठी खास पोस्ट देखील लिहिलेली. अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरजसमोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला. पण सूरजनं त्यांच्या प्रस्तावाला थेट होकार देणं टाळलं... सूरज नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर... 


अजितदादांनी दिला भेटीचा प्रस्ताव, सूरज म्हणाला... 


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आताच मी सुरज चव्हाणशी फोनवरून बोललो. त्याला मी सांगितलं की, मी आज बारामतीत आहे, आपण भेटूया तो म्हणाला, मी प्रयत्न करतो..." 


सूरजनं ट्रॉफी जिंकल्यावर अजितदादांनी केलेली खास पोस्ट 


अजित पवार यांनी आधीचं ट्विटर म्हणजेच, एक्स मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलेलं की, "आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!"


सुनेत्रा पवार यांचीही सूरजसाठी खास पोस्ट 


अजित पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही सूरजचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "बारामतीचा सूरजने बिग बॉस जिंकलं! आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या सुपुत्राने बिग बॉस शोचे विजेतेपद पटकावले. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज स्वत:च्या कलागुणांच्या बळावर आज जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथपर्यंत प्रसिद्धी पावला आहे. समस्त मराठी मनांचा लाडका झाला आहे. सूरजने पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती, की हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे. या उत्तुंग यशाबद्दल सूरजचे खूप खूप अभिनंदन."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


VIDEO: "सर, तुम्ही आलात म्हणून मी आलो…"; झापुक झुपूक सूरजची रितेश भाऊला कडकडून मिठी, नेमकं काय घडलं?