एक्स्प्लोर
Advertisement
पगाराचा वाद कायम, ऑस्ट्रेलियन टीमचा द. आफ्रिका दौऱ्यावर बहिष्कार
सिडनी : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) यांच्यातील पगारावरुन सुरु झालेला वाद अजूनही कायम आहे. परिणामी ऑस्ट्रेलिया अ संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघ दक्षिण आफ्रिकेसोबत चार दिवसीय सामना खेळणार होता. त्यानंतर तिरंगी मालिकेचंही आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये भारतीय संघही खेळणार आहे.
क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन (एसीए) यांच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीए आणि खेळाडूंमधला करार 30 जूनला संपला. ज्यानंतर 200 पेक्षा अधिक महिला आणि पुरुष क्रिकेटर बेरोजगार झाले आहेत. खेळाडू आणि सीए यांच्या नवा करारावरुन वाद सुरु आहे.
सीएने बोर्डाला होणाऱ्या कमाईतला हिस्सा खेळाडूंना द्यावा, अशी खेळाडूंची मागणी आहे. तर बोर्डाने या मागणीला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. असं केल्यास क्रिकेटच्या मुलभूत विकासासाठी पैसे उरणार नाहीत, असा दावा सीएने केला आहे.
हा वाद न सोडवणं दुर्दैवी आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया अ संघाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 200 महिला आणि पुरुष खेळाडूंच्या हितासाठी आहे, जे सध्या बेरोजगार आहेत, असं एसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलिस्टर निकोलसन यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement