बॉक्सिंग डे कसोटी : सात वर्षांचा आर्ची ऑस्ट्रेलियाचा सह-कर्णधार
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्याची माहिती शिलरला यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देण्यात आली होती. मला विराट कोहलीला बाद करायचं आहे, अशी इच्छा शिलरनं ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याकडे बोलून दाखवली होती.

मेलबर्न : पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं संघात मोठा बदल केला आहे. सात वर्षांचा फिरकीपटू आर्ची शिलरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आलं आहे.
मेलबर्न येथे होणाऱ्या या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघात सात वर्षाच्या आर्चीचा समावेश केला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी 15 जणांच्या संघामध्ये यजमानांनी सात वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा सह-कर्णधार देखील असणार आहे.
Fans thronged Yarra Park for the grand Indian Summer Festival happening in Melbourne. The two captains pose with the Border-Gavaskar trophy at the event #AUSvIND pic.twitter.com/BkY2Kd0l2O
— BCCI (@BCCI) December 23, 2018
ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आर्ची शिलरच्या वाढदिवसादिवशी शनिवारी रोजी ही घोषणा केली आहे. यानंतर आर्ची शिलरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव देखील केला आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये आर्ची शिलरला 15 वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर झाला. त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव केला होता. त्यानंतर आता त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. शिलरच्या निवडीला ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेननंदेखील दुजोरा दिला आहे. यारा पार्कमध्ये बुपा फॅमिली डे आयोजित करण्यात आला. त्यावेळी शिलरच्या निवडीबद्दल पेनला प्रश्न विचारण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्याची माहिती शिलरला यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देण्यात आली होती. मला विराट कोहलीला बाद करायचं आहे, अशी इच्छा शिलरनं ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याकडे बोलून दाखवली होती.























